Deepika Ranveer Wedding :दीपिका रणवीरवर शुभेच्छांचा वर्षाव, अनुष्काने दिल्या सर्वप्रथम शुभेच्छा….
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 09:56 AM2018-11-16T09:56:06+5:302018-11-16T09:57:20+5:30
दोघांचं प्रेम आणि एकमेंकाबाबत आदर तसंच मानसन्मान कायम राहो, लग्न झालेल्यांच्या क्लबमध्ये स्वागत आहे, अशा शब्दांत अनुष्काने ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या.
दीपिका आणि रणवीर आता जन्मोजन्मीचे जोडीदार झाले आहेत. दोघांचं इटलीतील लेक कोमो इथं शुभमंगल पार पडलं असून आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका त्यांनी घेतल्या आहेत. रेशीमगाठीत अडकल्यानंतर त्यांच्या लग्नाचे सुंदर फोटोही समोर आले आहेत. यानंतर तर सोशल मीडियावर दीपिका आणि रणवीरवर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला आहे. फॅन्ससह बॉलीवुड सेलिब्रिटीही दीपवीरला शुभेच्छा देत आहेत. या शुभेच्छा देण्यात आघाडीवर होती बॉलीवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा.
Wishing you both a world of happiness and a beautiful journey together. May the love & respect you have in each other, grow leaps and bounds. And welcome to the club 😁💜👫@RanveerOfficial@deepikapadukone
— Anushka Sharma (@AnushkaSharma) November 15, 2018
सिंधी पद्धतीने लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर रणवीर आणि दीपिकाने ८ वाजता त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यानंतर लगेचच अनुष्काने सगळ्यात आधी ट्विट करत दीपवीरला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. दोघांना जीवनातील सगळा आनंद मिळो आणि जीवनप्रवास सुखकर होवो. दोघांचं प्रेम आणि एकमेंकाबाबत आदर तसंच मानसन्मान कायम राहो, लग्न झालेल्यांच्या क्लबमध्ये स्वागत आहे, अशा शब्दांत अनुष्काने ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या. दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचे फोटो समोर न आल्याने सोशल मीडियावर काही मीम्स व्हायरल झाले होते.
यांत अनुष्काच्या मीमची जोरदार चर्चा होती.या मीममध्ये अनुष्का 'सुई धागा' सिनेमातील साडी परिधान केलेल्या अवतारात होती आणि त्यावर ''७ बज गये अभी तक कोई फोटो अपलोड नही हुई'' असं म्हटलं होतं. त्यातच ८ वाजता फोटो समोर आल्यावर अनुष्काने पहिल्या शुभेच्छा दिल्याने त्याचीही चर्चा होऊ लागली आहे. अनुष्का आणि विराट यांचं लग्नही गेल्यावर्षी इटलीमध्ये पार पडलं होतं.
अनुष्कानं ट्विटर अकाऊंटवर विराट कोहलीसोबत लग्नबेडीत अडकल्याचा फोटो शेअर करत सर्वांना सुखद धक्का दिला होता. अनुष्काचे हेच ट्विट बॉलिवूडसाठी 2017 वर्षातील 'गोल्डन ट्वीट' बनले होते. विराट-अनुष्काच्या लग्नासंबंधीचं ट्विट 2017मध्ये सर्वाधिक वेळा रीट्विट करण्यात आलेल्या ट्विट्सपैकी एक असल्याची अधिकृत माहिती ट्विटरनं दिली होती. अनुष्कानं लग्नाचा फोटो पोस्ट करत ट्विट केले होते की, 'आज आम्ही एकमेकांना कायमस्वरूपी प्रेमबंधनात बांधण्याचं वचन घेतलं आहे', आणि काही वेळातच विराट-अनुष्काच्या लग्नाचा फोटो असलेले हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.