Deepika Ranveer Wedding: रणवीर सिंग लग्नात थिरकला पद्मावत चित्रपटातील खलीबली या गाण्यावर, पाहा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 11:00 AM2018-11-15T11:00:38+5:302018-11-15T11:07:26+5:30
फिल्मीकलाकारच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. या व्हिडिओत प्रेक्षकांचा लाडका रणवीर सिंग पद्मावत चित्रपटातील खलीबली या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी काल इटलीत लग्न केले असल्याची सगळ्यांना कल्पना आहे. त्यांनी काल इटलीतील लेक कोमो परिसरात कोंकणी पद्धतीने विवाह केला तर आज सिंधी पद्धतीने त्यांचा विवाह होणार आहे. त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा अद्याप त्यांच्या दोघांकडून झालेली नाहीये. आज सिंधी पद्धतीने लग्न झाल्यानंतर ते लग्नाची घोषणा करणार असल्याचे म्हटले जात आहे.
रणवीर आणि दीपिकाने केवळ त्यांच्या जवळच्या नातलगांच्या आणि मित्र मैत्रिणीच्या उपस्थितीत लग्न केलं. हे लग्न अतिशय थाटामाटात झाले असून या लग्नाला प्रचंड सुरक्षा ठेवण्यात आली होती. लग्नातील कोणत्याही पाहुण्याला लग्न विधी अथवा लग्न परिसरातील कोणताही फोटो अथवा व्हिडिओ काढण्याची परवानगी नव्हती. त्यांच्या लग्नातील काही फोटो, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फिल्मीकलाकारच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. या व्हिडिओत प्रेक्षकांचा लाडका रणवीर सिंग पद्मावत चित्रपटातील खलीबली या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. हा व्हिडिओ त्यांच्या लग्न समारंभातलाच असला तरी तो कधी काढण्यात आलेला आहे याचा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आलेला नाहीये. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून याला काहीच तासांत हजारोहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असले तरी कोणत्याही फोटो अथवा व्हिडिओमध्ये ते स्पष्टपणे दिसत नाहीयेत. त्यामुळे ते त्यांच्या फॅन्ससाठी लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो कधी शेअर करणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे.
दीप- वीरच्या संगीत समारंभासाठी गायिका हर्षदीप कौरला आमंत्रित करण्यात आले होते. हर्षदीपने एकाहून एक दमदार गाणी सादर करत या समारंभात चार चाँद लावले. दीपवीरने संगीत सोहळ्यात धम्माल मस्ती केली. रणवीर यावेळी फुल मूडमध्ये होता. त्याने दीपिकासाठी ‘गुंडे’मधील ‘तुने मारी एंट्री’ गायले. संगीत समारोहात सगळेच भारतीय पोशाखात होते. ‘मेहंदी है रचने वाली’, ‘काला शा काला’च्या स्वरांची धूम होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही सेरेमनीत रणवीरने प्रचंड एन्जॉय केले. मुंबईत परतल्यानंतर २८ नोव्हेंबर २०१८ ला सायंकाळी ८ वाजता रिसेप्शन होणार आहे.