'या' प्रसिद्ध हॉटेलमध्ये दीपिकाच्या नावाने खास डिश, किंमत वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 03:50 PM2019-01-02T15:50:47+5:302019-01-02T16:05:34+5:30

बॉलिवूडमध्ये दीपिका पादुकोण-रणवीर सिंग हे कपल अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. दीपिका आणि रणवीर यांनी 14 नोव्हेंबरला कोंकणी तर 15 नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने लग्न केले

Deepika, a special dish in this famous hotel | 'या' प्रसिद्ध हॉटेलमध्ये दीपिकाच्या नावाने खास डिश, किंमत वाचून व्हाल थक्क!

'या' प्रसिद्ध हॉटेलमध्ये दीपिकाच्या नावाने खास डिश, किंमत वाचून व्हाल थक्क!

googlenewsNext
ठळक मुद्दे  दीपिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहेसध्या सोशल मीडियावर या हॉटेलचे मेन्यूकार्ड व्हायरल होते आहे

 बॉलिवूडमध्ये दीपिका पादुकोण-रणवीर सिंग हे कपल अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. दीपिका आणि रणवीर यांनी 14 नोव्हेंबरला कोंकणी तर 15 नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने लग्न केले. त्यांचा विवाहसोहळा इटलीतील लेक कोमो या नयनरम्य परिसरात पार पडला. लग्नानंतर त्यांनी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांसाठी आणि मित्रमैत्रिणींसाठी बंगळूरू आणि मुंबईत रिसेप्शन दिले होते.  दीपिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अमेरिकेतल्या टेक्ससमध्ये दीपिकाचे नाव एका डोशाला देण्यात आले आहे. सध्या सोशल मीडियावर या हॉटेलचे मेन्यूकार्ड व्हायरल होते आहे. तुम्हाला दीपिकाच्या नावाचा डोसा खायचा असेल तर तब्बल 10 डॉलर मोजावे लागलीत.





दीपिका पादुकोण आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे आणि त्याला कॅप्शनसुद्धा दिले आहे. दीपिका लिहिते, यापेक्षा सुंदर वर्षाची सुरुवात काय होऊ शकते.    


नुकताच दीपिकाने फिल्मफेयरमध्ये लग्नानंतर पहिली मुलाखत दिली. दीपिका म्हणाली, रणवीर माझ्या भांगात कुंकू भरत असताना मला ‘ओम शांती ओम’चा ‘एक चुटकी सिंदूर’ हा डायलॉग आठवत होता. मी अनेक लग्नाला गेले. पण स्वत:चे लग्न हा किती खास क्षण असतो, हे मला माझ्याच लग्नावेळी जाणवले, असे दीपिका यावेळी म्हणाली. मी अनेक वर्षे एकटी राहिली. पण आता रणवीर माझ्यासोबत राहात आहे. रणवीर त्याच्या कामावर जातो आणि मी माझ्या. पण सकाळी आम्ही एकत्र उठतो. ही लग्नाची सर्वात खास बाब आहे, असेही तिने सांगितले. 

Web Title: Deepika, a special dish in this famous hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.