​दीपिकाचा अ‍ॅक्शन अवतार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2016 09:18 PM2016-11-01T21:18:41+5:302016-11-01T21:18:41+5:30

टिझर पोस्ट करीत चाहत्यांना दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी आणखी एक कारण मिळवून दिले आहे.

Deepika's action incarnation | ​दीपिकाचा अ‍ॅक्शन अवतार

​दीपिकाचा अ‍ॅक्शन अवतार

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या आपल्या आगामी हॉलिवूडपटाच्या प्रमोशनात व्यस्त आहे. मात्र सोबतच ती आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करीतच असते. दीपिकाने आपला अ‍ॅक्शन अवतार आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या आगामी ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झेंडर केज’ या चित्रपटाचा टिझर पोस्ट करीत चाहत्यांना दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी आणखी एक कारण मिळवून दिले आहे.

'ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झेंडर केज' हा चित्रपट दीपिकाचा पहिला हॉलिवूडपट असून या चित्रपटाच्या माध्यमातून तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने इमा अवॉर्डस्मध्ये ती हजेरी लावणार आहे. दीपिका ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झेंडर केज’ या चित्रपटात ती सेरेना उनगेरच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या टिझरमध्ये केवळ दीपिकाचाच जलवा पाहयला मिळतो आहे. ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झेंडर केज’च्या पहिल्या पोस्टर व ट्रेलरने नाराज झालेल्या तिच्या चाहत्यासाठी केवळ दीपिकाचे अ‍ॅक्शन दृष्य असलेला टिझर पाहून आनंद साजरा करता येणार आहे.

https://www.instagram.com/p/BMO4QMPjL_9/

इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केलेल्या या टिझरमध्ये ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झेंडर केज’ या चित्रपटात साकारलेले अ‍ॅक्शन सिन, डायलॉग डिलिव्हरी आणि चित्रपटातील तिचा लूक चाहत्यांना आवडले आहेत. तिच्या या पोस्टवर लाईक्सचा पाऊस पडतो आहे. विन डिझेल व दीपिकाची प्रमुख भूमिका असलेला ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झेंडर केज’ हा चित्रपट इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर दीपिका संजय लीला भन्साळीच्या ‘पद्मावती’मध्ये व्यस्त होणार आहे.

https://www.instagram.com/p/BMOXLRaj4MV/

Web Title: Deepika's action incarnation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.