Pathaan : शाहरुखला पुन्हा झटका, पठाणच्या ओटीटी रिलीज मध्येही बदल होणार, दिल्ली कोर्टाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 09:06 AM2023-01-17T09:06:51+5:302023-01-17T09:10:16+5:30
पठाणच्या रिलीज आधीच सिनेमाचे ओटीटी राईट्स १०० कोटींना विकले गेले आहेत. मात्र आता दिल्ली उच्च न्यायालयाने ओटीटी रिलीजपूर्वी काही बदल करण्याचे आदेश दिले आहेत.
Pathaan : यशराज फिल्म्सचा आगामी पठाण सिनेमा येत्या काही दिवसात प्रदर्शित होणार आहे. पठाणमधून शाहरुख खान (Shahrukh Khan) ४ वर्षांनी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. सिनेमाचा वाद पाहता पठाणला तसा फायदाच झाला आहे. रिलीज आधीच सिनेमाचे ओटीटी राईट्स १०० कोटींना विकले गेले आहेत. मात्र आता दिल्ली उच्च न्यायालयाने ओटीटी रिलीजपूर्वी काही बदल करण्याचे आदेश दिले आहेत.
पठाण मध्ये होणार बदल
पठाण च्या ओटीटी रिलीजसाठी ऑडियो, क्लोज कॅप्शनिंग, आणि सबटायटल्स तयार करण्याचे आदेश दिले आहेत. दृष्टिबाधित लोकही फिल्म बघू शकतील म्हणून हे बदल सुचवले आहेत. यानंतर कोर्टाने मेकर्सला फिल्मचे रिसर्टिफिकेशन सीबीएफसी कडे जमा करण्यास सांगितले आहे.
दिल्ली कोर्टाने दिलेल्या या सूचना सिनेमाच्या थिएटर रिलीजसाठी लागू नसून केवळ ओटीटी रिलीजसाठीच आहेत. तसेच कोर्टाने प्रोडक्शन हाऊसला काही नव्या गोष्टीही जोडायला सांगितल्या आहेत. कोर्टाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे मेकर्सला बदल करावे लागणार आहेत त्यानंतरच पठाण ओटीटी वर रिलीज केला जाऊ शकतो.
'बेशरम रंग'मुळे सुरु झाला वाद
'पठाण'चे पहिले गाणे बेशरम रंग रिलीज झाले आणि वाद पेटला. गाण्यात भगव्या रंगाची बिकीनी घातल्याने काही संघटनांनी सिनेमाला विरोध केला होता. हा वाद एवढा वाढला की सेन्सॉर बोर्डानेही मेकर्सला बदल करण्यास सांगितले. आता पठाण २५ जानेवारी रोजी रिलीज होण्यास सज्ज आहे. सिनेमाच्या ट्रेलरला आतापर्यंत उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला आहे.