Salman Khan: मोठा खुलासा! सलमानची सुपारी घेणारा चिरकूट नव्हता; अल्पवयीन असला तरी पाकिस्तानी ISIशी संबंध, झाली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 21:01 IST2022-10-07T20:59:41+5:302022-10-07T21:01:11+5:30
पनवेल येथील सलमानच्या फार्महाऊस जवळ दीड महिना गँगस्टर टपून बसले होते. त्यात हा होता, त्यानेच पंजाबमधील मोहाली पोलिस मुख्यालयावर ९ मे रोजी आरपीजी हल्ला केला होता.

Salman Khan: मोठा खुलासा! सलमानची सुपारी घेणारा चिरकूट नव्हता; अल्पवयीन असला तरी पाकिस्तानी ISIशी संबंध, झाली अटक
काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला त्याच्या पनवेल येथील रिसॉर्टजवळ मारण्याचा प्लॅन उघड झाला होता. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या गँगस्टर्सकडून मोठा खुलासा झाला होता. बिश्नोई गँग सलमानची हत्या करणार होती.
सलमान खानला मारण्यासाठीचा पूर्ण प्लान जवळपास निश्चित झाला होता. पनवेल येथील सलमानच्या फार्महाऊस जवळच सुमारे दीड महिना सर्व गँगस्टर थांबले होते आणि संपूर्ण रेकी करण्यात आली होती. फार्म हाऊसच्या आतच सलमानला मारण्याचा प्लान आखला गेला होता. सलमानला ठार करण्याचा आदेशही गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं दिला होता. पण सलमान भोवतीच्या कडक सुरक्षा व्यवस्थेनं प्लान यशस्वी होऊ शकला नाही, असा खुलासा गँगस्टर कपिल पंडीतने पोलिसांना दिला होता. यामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे.
या सलमानला मारण्याची सुपारी ज्या अल्पवयीन मुलाला देण्यात आली होती, त्याच्याबाबत मोठे खुलासे झाले आहेत. पंजाबमधील मोहाली पोलिस मुख्यालयावर ९ मे रोजी झालेल्या आरपीजी हल्ल्याप्रकरणी फैजाबाद येथून एका मास्टरमाइंड अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. हा तोच होता, ज्याने सलमानची सुपारी घेतली होती. या अल्पवयीन मुलाचे संबंध सीमेपलिकडे पाकिस्तान आणि कॅनडात होते, असे चौकशीत समोर आले आहे. पाकिस्तानी आयएसआय दहशतवादी रिंदा आणि कॅनडामध्ये बसलेल्या लांडा हरि आणि लॉरेश बिश्नोई जग्गू भगवानपुरिया यांच्याशी त्याचे थेट कनेक्शन होते.
या अल्पवयीन गँगस्टरने 4 ऑगस्ट 2021 रोजी, अमृतसरमध्ये, त्यांनी लॉरेश विरोधी टोळीचा मुख्य नेमबाज असलेल्या राणा कंडोबलियाचा खून केला होता. 5 एप्रिल 2022 रोजी संजय वियानी या बिल्डरची हत्या करण्यात आली होती. त्याची हत्या पाकिस्तानातून आलेल्या आदेशानंतर झाली होती. ही हत्या देखील या अल्पवयीन मुलाने केली होती.