डिप्रेशन, हार्ट अटॅक आणि मुलीला बलात्काराच्या धमक्या; अनुराग कश्यपने केले अनेक खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 17:44 IST2022-11-27T17:39:44+5:302022-11-27T17:44:12+5:30
अनुराग कश्यपला गेल्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला होता, तेव्हा त्याची तब्येत खूप बिघडली होती.

डिप्रेशन, हार्ट अटॅक आणि मुलीला बलात्काराच्या धमक्या; अनुराग कश्यपने केले अनेक खुलासे
Anurag Kashyap: चित्रपट निर्माता अनुराग कश्यप (Anurag Kashyap) याने त्याच्या आयुष्यातील काही वाईट काळाबद्दल अनेक खुलासे केले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने खुलासा केला की, तो काही काळ नैराश्यात गेला होता. त्या वेळेस त्याला तीन वेळा पुनर्वसन केंद्रात जावे लागले होते. यासोबतच त्याने मुलगी आलिया कश्यप हिला बलात्काराच्या धमक्या मिळाल्याचेही सांगितले.
अनुराग कश्यपने ट्विटर का सोडले?
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (CAA) अनुरागने ट्विटरवर लिहिले होते, तेव्हा त्याला प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला होता. द इंडियन एक्स्प्रेसशी झालेल्या संभाषणात तो म्हणाला, “मी त्या मुद्द्यावर बोललो म्हणून माझ्या मुलीला ट्रोल केले जाऊ लागले. तिला बलात्काराच्या धमक्याही येत होत्या. यामुळे मी खूप चिंतेत होते, त्यामुळेच मी 2019 मध्ये ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतला आणि पोर्तुगालला गेलो."
हार्ट अटॅकही आला होता
अनुराग पुढे म्हणाला, मी लंडनमध्ये होतो, तेव्हा जामिया मिलियाची घटना घडली. मी भारतात परतलो, मी विचार करत होतो की, कोणी यावर काहीच का बोलत नाहीये. म्हणूनच मी पुन्हा (ट्विटरवर) बोलायला सुरुवात केली. यादरम्यान त्याने खुलासा केला की, अनुरागला गेल्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी त्याची प्रकृती खूप खालावली होती.
वर्क फ्रंट
अनुरागच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, तो आपल्या आगामी "ऑलमोस्ट प्यार विद डीडे मोहब्बत'च्या प्रदर्शनाचीवाट पाहत आहे. या चित्रपटात अलाया एफ आणि करन मेहता दिसणार आहेत. हा चित्रपट अनुराग कश्यप आणि झी स्टूडियोज प्रोड्यूस करत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी जानेवारी महिन्यात रिलीज होईल.