अमृता फडणवीसांनी सलमानसमोर म्हटला गणपती मंत्र, भाईजानची अशी होती रिअ‍ॅक्शन, पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 11:08 AM2024-08-29T11:08:28+5:302024-08-29T11:11:20+5:30

गणेशोत्सवानिमित्त आयोजित एका कार्यक्रमाला अमृता यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बॉलिवूडचा भाईजान सलमान खानही उपस्थित होता. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ समोर आला आहे. 

deputy cm devendra fadnavis wife amruta fadnavis sing ganpati mantra in front of salman khan watch video | अमृता फडणवीसांनी सलमानसमोर म्हटला गणपती मंत्र, भाईजानची अशी होती रिअ‍ॅक्शन, पाहा व्हिडिओ

अमृता फडणवीसांनी सलमानसमोर म्हटला गणपती मंत्र, भाईजानची अशी होती रिअ‍ॅक्शन, पाहा व्हिडिओ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या उत्तम गायिका आहेत. आजवर त्यांनी अनेक गाण्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अनेक कार्यक्रमांनाही त्या उपस्थिती दर्शवताना दिसतात. गणेशोत्सवानिमित्त आयोजित एका कार्यक्रमाला अमृता यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बॉलिवूडचा भाईजान सलमान खानही उपस्थित होता. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ समोर आला आहे. 

कार्यक्रमात अमृता फडणवीसांना चाहत्यांनी गाणं म्हणण्याची विनंती केली. अमृता यांनी त्यांच्या सुमधूर आवाजात गणपती मंत्र म्हणून दाखवलं. कार्यक्रमातील या व्हिडिओमध्ये अमृता यांच्याबरोबर स्टेजवर सलमान खानही दिसत आहे. अमृता गणपती मंत्र म्हणत असताना सलमानही त्याचा आनंद घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. अमृता फडणवीस गणपती मंत्र म्हणत असताना चाहत्यांनी एका तालात टाळ्या वाजवत त्यांना साथ दिल्याचं पाहायला मिळत आहे. कार्यक्रमातील हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 


या कार्यक्रमात सलमान खानने अमृता फडणवीस आणि चाहत्यांच्या आग्रहाखातर डान्सही केला. मेरा ही जलवा या गाण्यावर भाईजान थिरकल्याचं पाहायला मिळालं. या कार्यक्रमात सलमानने घरच्या घरीच गणपतीचं विसर्जन करण्याचं आवाहनही केलं. तो म्हणाला, "आता गणेशोत्सव येणार आहे. आपण खूप साऱ्या इको फ्रेंडली गणपतीच्या मूर्ती बनवल्या आहेत. आम्ही आमच्या घरीही इकोफ्रेंडली गणपतीच बसवतो. कारण, त्याचं घरीच विसर्जन करता येईल". 

Web Title: deputy cm devendra fadnavis wife amruta fadnavis sing ganpati mantra in front of salman khan watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.