पतीनं सोडलं, बॉयफ्रेंडनं ढकललं वेश्याव्यवसायात, कोट्यावधींची मालकीण असलेल्या अभिनेत्रीचा झाला दुर्दैवी शेवट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 06:22 PM2023-05-29T18:22:14+5:302023-05-29T18:23:15+5:30
३३ वर्षांच्या आयुष्यात आणि १० वर्षांच्या सिने कारकिर्दीत या अभिनेत्रीने खूप त्रास सहन केला. तिचा अंत दुर्देवी झाला होता.
१९६० आणि १९७० च्या दशकात रुपेरी पडद्यावर राज्य करणारी सुंदर अभिनेत्री विमी तिच्या पहिल्याच चित्रपटातून स्टार बनली. तिच्या सौंदर्यावर सगळेच फिदा झाले होते. सिने इंडस्ट्रीतील अनेक बडे स्टार्स तिच्या सौंदर्याचे आणि स्टाइलचे वेड होते. अगदी लहान वयात तिने या जगाचा निरोप घेतला होता. १९४३ मध्ये पंजाबमधील जालंधर येथे जन्म आणि १९७७ मध्ये तिने जगाचा निरोप घेतला. तिच्या ३३ वर्षांच्या आयुष्यात आणि १० वर्षांच्या सिने कारकिर्दीत तिने खूप त्रास सहन केला. तिचा शेवट दुर्देवी झाला होता.
६० आणि ७०च्या दशकातील सुंदर आणि अभिनेत्रींमध्ये विमीचे नाव सर्वात आधी येते. त्या काळात विमी प्रत्येक चित्रपटासाठी ३ लाख रुपये घेत असे आणि तिच्या व्यवसायातून करोडोंची कमाई करत असे. पण या अभिनेत्रीचा मृत्यू झाला तेव्हा तिच्याकडे एक दमडीही शिल्लक नव्हती. तिच्या अंतिम संसाराइतके पैसेही तिच्या कुटुंबीयांकडे उरले नव्हते. विमीने बी.आर. चोप्राच्या १९६७ मध्ये आलेल्या 'हमराज' चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बराच काळ वर्चस्व गाजवले. विमीचे नशीब या चित्रपटाने उघडले. यानंतर ती 'पतंगा', 'वचन' आणि 'आबरू', 'नानक नाम जहाज है' यासारख्या चित्रपटांमध्ये झळकली. तिने एकूण १० चित्रपटांमध्ये काम केले पण तिचे बरेचसे चित्रपट फ्लॉप ठरले.
लग्नानंतर वडिलांनी तिच्यासोबतचे संबंध तोडले
चित्रपटात येण्यापूर्वी विमीचे लग्न झाले होते. त्या काळातील प्रसिद्ध उद्योगपतीचा मुलगा शिव अग्रवाल यांच्याशी तिचा लग्न झाला होता. शिव अग्रवालसोबत लग्न करण्यासाठी विमी तिच्या घरच्यांच्या विरोधात गेल्याचे सांगितले जाते. लग्नानंतर वडिलांनी तिच्याशी सर्व संबंध तोडले. लग्नानंतर विमी जेव्हा अभिनेत्री बनली तेव्हा सासरचे लोक तिच्या विरोधात गेले. तरीही तिच्या पतीने तिला पाठिंबा दिला. या लग्नापासून विमीला दोन मुले झाली.
वस्त्रोद्योगात बुडाल्यामुळे तिची झाली दयनीय अवस्था
सिनेमात दिसल्यानंतर विमीने तिच्या पतीपासून घटस्फोट घेतला. कोलकात्याच्या मोठ्या उद्योगपतीपासून वेगळी झाल्यानंतर तिचे नाव सिने निर्माता जॉलीसोबत जोडले गेले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्माता जॉलीमुळे तिचे खासगी आणि व्यावसायिक आयुष्य उद्ध्वस्त झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपट आणि कापड व्यवसायातून लाखो रुपये कमावणाऱ्या विमीची अवस्था वस्त्रोद्योगात बुडाल्यामुळे दयनीय झाली. कंपनी बुडाल्यानंतर तिचे इतके नुकसान झाले की तिच्यावर लाखोंचे कर्ज झाले. नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर ती आधीच डिप्रेशनमध्ये होती. पुढे जॉलीच्या सहवासात तिला दारूचं व्यसन लागले. पुढे ती वेश्या व्यवसायाच्या मार्गाला लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विमीचा खूप जवळचा मित्र असलेल्या कृष्णानेही तिच्या वेश्याव्यवसायाचा भाग स्वीकारला होता. तिने सांगितले होते की जॉलीला भेटल्यानंतर ती वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाऊ लागली आणि वेश्याव्यवसायाचा भाग बनली. जॉलीने तिच्यावर जबरदस्ती सुरू केली.
विमीचा मृत्यू अति मद्यपानामुळे झाला होता
विमीचा मृत्यू अति मद्यपानामुळे झाला होता. अखेरच्या काही दिवसांत ३३ वर्षीय विमीचे यकृत खराब झाले होते. तिच्याकडे उपचारासाठी पैसे नव्हते. आयुष्याच्या शेवटच्या दिवसात तिला मुंबईतील नानावटी हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. जिथे २२ ऑगस्ट १९७७ रोजी विमीचे निधन झाले. तिच्या निधनानंतर तिला स्मशानभूमीत नेण्यासाठी तिचा नवरा, मुले, मित्र किंवा जवळचे कोणीही नव्हते. तिला खांदा द्यायला कोणीच नव्हते. आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या जॉलीने एका चहा विक्रेत्याची गाडी घेऊन तिचा मृतदेह गाडीत ठेवून स्मशानभूमीत नेल्याचे सांगितले जाते.