अभिनयक्षेत्राचा 52 वर्षांचा तगडा अनुभव असूनही महानायकाला आजही वाटते एका गोष्टीची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 02:38 PM2021-01-29T14:38:01+5:302021-01-29T14:40:12+5:30
अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांच्या मनात दडलेल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. हे वाचून प्रत्येकाला थोडं आश्चर्यही वाटले असेलच.
हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशाह महानायक अमिताभ बच्चन यांची बातच न्यारी हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गेल्या पाच दशकापासून रसिकांना आपल्या अभिनयाने मनोरंजन करणारा हा अभिनेता रोज काही ना काही नवीन रसिकांना काय देता येइल याच गोष्टीचा ध्यास त्यांना असतो.अमिताभ यांनी आगामी Mayday सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. याच सिनेमाच्या निमित्ताने एक अमिताभ यांची एक खास गोष्ट समोर आली आहे. खुद्द अमिताभ यांनीच त्यांच्या मनात काय सुरु आहे हेच चाहत्यासह शेअर केले आहे.
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांच्या मनात दडलेल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. हे वाचून प्रत्येकाला थोडं आश्चर्यही वाटले असेलच. आजही सिनेमाच्या शूटिंगचा पहिला दिवस म्हटला की, महानायक अमिताभ यांना धडकी भरते. काय होईल? कसे होईल? अशी चिंता अमिताभ यांनाही सतावत असते.आजपर्यंत केलेल्या प्रत्येक सिनेमाच्या शुटिंगच्या सुरुवातील अशी धडकी त्यांना भरते.
अमिताभ बच्चन यांनी 10 वर्षांपूर्वी केले होते ‘ते’ ट्वीट, आजपर्यंत होताहेत ट्रोल
अमिताभ बच्चन 10 वर्षांपूर्वी केलेल्या एका ट्वीटमुळे आजही ट्रोल झाले नसते. होय, ऐकून आश्चर्य वाटेल, पण अमिताभ बच्चन यांनी 10 वर्षांपूर्वी अंडरगारमेंटवर एक ट्वीट केले होते. या ट्वीटवरून ते तेव्हाही ट्रोल झाले होते. आज 10 वर्षांनंतरही ते ट्रोल होत आहेत. अमिताभ सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहेत. अशात अनेकदा ते ट्रोल होतात. सध्याही ते असेच ट्रोल होत आहेत. कोणीतरी त्यांचे 10 वर्ष जुने ट्वीट शोधून ते व्हायरल केले.
कोरोना कॉलर ट्यूनसाठी 'बिग बिं'ना किती मानधन? सरकार म्हणतंय...
'कोव्हिड १९ अभी खत्म नहीं हुआ है... इसलिए जब तक दवाई नहीं तब तक ढिलाई नहीं', या अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यूनने मोबाईल युजर्सं वैतागल होते. सोशल मीडियावर करोना व्हायरसच्या कॉलर ट्यूनवरून अनेक जणांनी जोक, मिम्स बनवले होते. तर, कित्येकांनी आता ही कॉलरट्यून बंद करा, म्हणून मोबाईल सीम कंपन्यांकडे तक्रारही केली होती. विशेष म्हणजो कोरोना व्हायरसची कॉलर ट्यून बंद करण्यासाठी काही जणांनी कोर्टात याचिकाही दाखल केल्या होत्या. आता माहिती अधिकार कार्यकर्ते अॅड. प्रणय अजमेरा यांनी अमिताभ बच्चन यांना या कॉलर ट्यूनसाठी किती मानधन दिले होते, यासंदर्भात माहिती मागवली होती. मात्र, यासंदर्भातील माहिती आपल्याकडे उपलब्ध नसल्याचे माहिती व प्रसारण मंत्रालयाने उत्तरादाखल दिलेल्या पत्रात म्हटले आहे.