Birthday Special : स्टार किड असूनही १०० वेळा रिजेक्ट झाला होता शाहिद कपूर, ऑडीशनसाठीही नसायचे पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 11:57 AM2021-02-25T11:57:45+5:302021-02-25T11:58:37+5:30
आपल्या कामावरील प्रेम,जिद्द आणि मेहनतीमुळे शाहदिनं नवी उंची गाठली असून तो रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.
शाहिद कपूरचा आज वाढदिवस आहे. शाहिद चाळीस वर्षांचा झाला आहे. आज लाखों तरुणींच्या दिलों की धडकन बनलेला शाहिदलाही यश मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावे लागले आहे. तुमच्या अंगी कला असेल तर यश, पैसा आणि प्रसिद्धी नक्की मिळते. हे सिद्ध करून दाखवलंय शाहिद कपूरने.
प्रत्येक यशस्वी व्यक्तीने त्याने करिअरच्या सुरुवातीला संघर्ष केलेला असतो. जिद्द, मेहनत आणि अथक प्रयत्न यांच्या जोरावर अनेक संकटं तसंच अडचणींवर मात करत ती व्यक्ती यशशिखरावर पोहोचते. त्यामुळंच की काय प्रत्येक व्यक्तीसाठी करिअरच्या सुरुवातीचा काळ आठवणीत ठेवण्यासारखा असतो. शाहिद कपूरसाठीही करिअरचे सुरुवातीचे दिवस संस्मरणीय आहेत. आज चित्रपटसृष्टीतील सुपरिहट अभिनेत्यांच्या यादीत शाहिदसाठी ते दिवस ओल्ड इज गोल्ड असेच आहेत.
अनेकदा स्टारकिड असल्यामुळे त्याला अनेक संधी उपलब्ध होतात. स्ट्रगल करावा लागत नाही अशा गोष्टी ऐकायला मिळतात. मात्र स्टारकिड असो वा कोणीही या इंडस्ट्रीत टॅलेट असेल तरच तुम्हाला संधी मिळवते. त्याहूनही रसिकांची पसंती मिळाली तरच तुमचा इथे टिकाव लागू शकतो. कीतीही मोठ्या स्टारची तुम्ही मुंल असू द्या रसिकप्रेक्षांनी तुम्हाला स्विकारले नाही तर स्टारकिड असूनही तुम्ही इथे करिअर घडवू शकत नाही.
शाहिदनं बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. बॅकग्राउंड डान्सर, सहाय्यक कलाकार अशा छोट्या-मोठ्या भूमिका साकारत तो आज बिग बजेट सिनेमांचा अभिनेता बनण्यापर्यंतचा त्याचा यशस्वी प्रवास शाहिदनं केलाय. अनेकदा ऑडीशनला जाण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसेही नसायचे. ऑडीशन दरम्यान तर १०० वेळा त्याला रिजेक्टही केले गेले आहे. तरीही शाहिदनं हार मानली नाही. जिद्द, मेहनत आणि उत्साह हेच शाहिदच्या यशाचे खरं कारण आहे.
आपल्या कामावरील प्रेम,जिद्द आणि मेहनतीमुळे शाहदिनं नवी उंची गाठली असून तो रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. कोणतंही काम करताना तो त्याच उत्साहाने तो काम करतो.. त्यामुळं आजवर जीवनात कितीही चढउतार आले तरी तो डगमगला नाही... कोणतंही काम उत्साह, जिद्द आणि मेहनतीने केल्यास जीवनात अशक्य असं काही नसतं असेच शाहिदने सांगितले.