'तुला सिनेमात घेतलं हेच खूप आहे'; 'दिल तो पागल हैं'साठी अक्षय कुमारला मिळालं नव्हतं मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 02:43 PM2023-12-12T14:43:48+5:302023-12-12T14:45:28+5:30

Akshay kumar: या सिनेमानंतर अक्षयने यशराज बॅनरसोबत जवळपास १० वर्ष काम केलं नव्हतं.

despite-this-film-being-a-hit-the-director-did-not-pay-fees-to-akshay-kumar | 'तुला सिनेमात घेतलं हेच खूप आहे'; 'दिल तो पागल हैं'साठी अक्षय कुमारला मिळालं नव्हतं मानधन

'तुला सिनेमात घेतलं हेच खूप आहे'; 'दिल तो पागल हैं'साठी अक्षय कुमारला मिळालं नव्हतं मानधन

आज बॉलिवूडमध्येअक्षय कुमार (akshay kumar) या नावाचा दबदबा आहे. आजवर त्याने अनेक सुपरहिट सिनेमा बॉलिवूडला दिले आहेत. त्यामुळे लोकप्रिय आणि नावाजलेल्या अभिनेत्यांच्या यादीत त्याचं नाव आवर्जुन घेतलं जातं.मात्र, एक काळ असा होता ज्यावेळी त्याला सिनेमात काम केल्यानंतर साधे मानधनाचे पैसेही मिळाले नव्हते. विशेष म्हणजे हा सिनेमा सुपरहिट ठरुनही अक्षयला मात्र त्यात फुकटात काम करावं लागलं होतं. त्याचा हा किस्सा सध्या सोशल मीडियावर चर्चिला जात आहे.

यशराज बॅनरचा 'दिल तो पागल है' हा सिनेमा तर प्रत्येक बॉलिवूड प्रेमीला माहित असेल. माधुरी दिक्षीत, करिश्मा कपूर आणि शाहरुख खान यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला. या सिनेमात अक्षय कुमारही झळकला होता. मात्र, त्याला इतर कलाकारांच्या तुलनेत कमी स्क्रीन टाइम मिळाला होता. विशेष म्हणजे फक्त कमी स्क्रीन टाइम नाही तर त्याला सिनेमासाठी साधं मानधन सुद्धा दिलं नव्हतं.

सिनेमाचं शुटिंग झाल्यानंतर अक्षय मेकर्सकडे त्याच्या कामाचे पैसे मागायला गेला. मात्र, त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तुला या सिनेमात घेतलं हेच खूप आहे, असं सांगत त्याला मानधन नाकारलं.

दरम्यान, या सिनेमासाठी अक्षयला त्याचे केस कमी करायला सांगितले होते. मात्र, अक्षय कुमारने त्याचे केस कापण्यास थेट नकार दिला. या गोष्टीचा राग सिनेमाच्या मेकर्समध्ये होता. विशेष म्हणजे या सिनेमाचं त्याला मानधन न दिल्यामुळे त्याने यशराज बॅनरकडे पाठ फिरवली. जवळपास १० वर्ष त्याने या बॅनरअंतर्गत कोणताही सिनेमा केला नाही.
 

Web Title: despite-this-film-being-a-hit-the-director-did-not-pay-fees-to-akshay-kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.