देव आनंद यांच्या ७३ वर्ष जुन्या बंगल्याची विक्री नाही; कुटुंबीय म्हणाले, "४०० कोटींची डील..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 02:26 PM2023-09-20T14:26:14+5:302023-09-20T14:27:23+5:30
देव आनंद यांच्या जुहू येथील बंगल्याची विक्री झाल्याचं वृत्त होतं. ४०० कोटींना देव आनंद यांचा बंगला विकला गेल्याची माहिती होती. आता यावर देव आनंद यांचे पुतणे केतन आनंद यांनी भाष्य केलं आहे.
दमदार अभिनयाने ६०-७०चं दशक गाजवलेले दिवगंत अभिनेते देव आनंद त्यांच्या जुहू येथील घरामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. देव आनंद यांच्या जुहू येथील बंगल्याची विक्री झाल्याचं वृत्त होतं. ४०० कोटींना देव आनंद यांचा बंगला विकला गेल्याची माहिती होती. हा बंगला पाडून त्यावर २२ मजली टॉवर बांधण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं. आता यावर देव आनंद यांचे पुतणे केतन आनंद यांनी भाष्य केलं आहे.
देव आनंद यांच्या बंगल्याची विक्री झाल्याचं वृत्त खोटं असल्याचं केतन आनंद यांनी सांगितलं आहे. याबरोबरच तो बंगला पाडून त्याजागी २२ मजली टॉवर उभं राहणार असल्याच्या बातमीतही तथ्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देव आनंद यांच्या कुटुंबीयांकडून अशा प्रकारची कोणतीही डील झालं नसल्याचं त्यांनी ईटाइम्सला सांगितलं. देव आनंद यांच्या मुलांनाही संपर्क केल्याचं केतन यांनी सांगितलं.
दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने गुपचूप उरकलं लग्न? 'तो' फोटो व्हायरल
देव आनंद यांचा मुलगा सुनील आनंद आणि मुलगी देविना यांनी जुहू येथील त्यांचा बंगला विकण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी आलं होतं. बंगल्याची देखभाल करायला कोणीही नसल्याने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं होतं. देव आनंद यांचा मुलगा अमेरिकत तर मुलगी उटीला असते. देव आनंद यांच्या कुटुंबीयांनी ४०० कोटींची डील केल्याचंही म्हटलं होतं. पण, आता हे वृत्त खोटं असल्याचा दावा केतन आनंद यांनी केला आहे.