Deva on OTT: शाहिद कपूरचा 'देवा' सिनेमा ओटीटीवर कधी रिलीज होणार? समोर आली मोठी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 10:08 IST2025-02-10T10:04:34+5:302025-02-10T10:08:16+5:30

'देवा'च्या ओटीटी रिलीजबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे (shahid kapoor, deva)

Deva movie on ott shahid kapoor pooja hegade directed by roshan andrews | Deva on OTT: शाहिद कपूरचा 'देवा' सिनेमा ओटीटीवर कधी रिलीज होणार? समोर आली मोठी अपडेट

Deva on OTT: शाहिद कपूरचा 'देवा' सिनेमा ओटीटीवर कधी रिलीज होणार? समोर आली मोठी अपडेट

शाहिद कपूरचा 'देवा' (deva) सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. 'देवा' सिनेमाला थिएटरमध्ये संमीश्र प्रतिसाद मिळाला. सिनेमाची जितकी चर्चा होती त्या तुलनेत 'देवा' थिएटरमध्ये इतका चालला नाही. शाहिद कपूरच्या (shahid kapoor) अभिनयाचं मात्र खूप कौतुक झालं. इतकंच नव्हे पूजा हेगडेने (pooja hegade) साकारलेल्या भूमिकेलाही प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. परंतु 'देवा'ला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळालं. ज्यांना 'देवा' थिएटरमध्ये पाहता आला नाही, त्यांना आता सिनेमा ओटीटीवर बघण्याची संधी मिळणार आहे. 'देवा'च्या ओटीटी रिलीजबद्दल अपडेट समोर आली आहे.

'देवा' ओटीटीवर कधी रिलीज होणार?

शाहिद कपूरचा 'देवा' सिनेमा ३१ जानेवारी २०२५ ला रिलीज झाला. 'देवा'ने गेल्या काही दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर २० कोटींची कमाई केली. थिएटरमध्ये कमी प्रतिसाद मिळाल्याने 'देवा' ओटीटीवर लवकर रिलीज होण्याची शक्यता आहे. 'देवा' सिनेमाच्या ओटीटी रिलीजबद्दल सांगायचं तर, हा सिनेमा नेटफ्लिक्सवर होणार आहे. पुढील सहा ते सात आठवड्यांमध्ये अर्थात मार्च महिन्यात 'देवा' सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

'देवा' सिनेमाबद्दल

शाहिद कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या 'देवा' सिनेमाचं दिग्दर्शन रोशन अँड्र्यूज यांनी केलं. सिनेमाची निर्मिती सिद्धार्थ रॉय कपूरने केली. शाहिद कपूरने सिनेमात देव आंब्रे या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली. पूजा हेगडे, पावेल गुलाटी या कलाकारांनी 'देवा'मध्ये काम केलं. हा सिनेमा 'मुंबई पोलीस' या साउथ सिनेमाचा रिमेक होता. सिनेमाचा टीझर, ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु सिनेमाला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळालं.

Web Title: Deva movie on ott shahid kapoor pooja hegade directed by roshan andrews

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.