'आदिपुरुष' चित्रपटासाठी देवदत्त नागेला मिळालं इतकं मानधन, खुद्द त्यानेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 08:27 PM2023-04-18T20:27:00+5:302023-04-18T20:27:48+5:30

Devdutta Nage : आदिपुरुष या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सनॉन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटात हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Devdutta Nage got so much remuneration for the movie 'Adipurush', he himself revealed | 'आदिपुरुष' चित्रपटासाठी देवदत्त नागेला मिळालं इतकं मानधन, खुद्द त्यानेच केला खुलासा

'आदिपुरुष' चित्रपटासाठी देवदत्त नागेला मिळालं इतकं मानधन, खुद्द त्यानेच केला खुलासा

googlenewsNext

जय मल्हार या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता देवदत्त नागेने मराठी सिनेसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्येही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता लवकरच तो ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या चित्रपटात हनुमानाची भूमिका बजावताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने या चित्रपटातील त्याचा लूक शेअर केला होता. आता या चित्रपटाच्या मानधनाबाबत त्याने खुलासा केला आहे.

आदिपुरुष या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सनॉन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटात हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटाबाबत नवीन माहिती समोर यायला सुरुवात झाली आहे. देवदत्तने नुकतेच एका मुलाखतीत त्याला ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली याबद्दल तो खूप खूश असून स्वतःला भाग्यवान समजतो असे तो म्हणाला.

देवदत्त म्हणाला की, हा सिनेमा आणि ही भूमिका हेच माझ्यासाठी मानधन आहे. प्रसिद्धीच्या पलीकडचे आहे. ज्या शरीरयष्टीमुळे मला ओळखले जाते. त्याचे सगळे श्रेय मारुतीरायाचे आहे. मी गेली २५ वर्षं व्यायाम करतोय आणि मारुतीरायाच त्यामागची प्रेरणा आहे. लहानपणापासून प्रभू श्रीरामांचे आणि मारुतीरायाचे स्मरण करून माझ्या दिवसाची सुरुवात होते. त्यामुळे या चित्रपटात मला हनुमानाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. 


मागील वर्षी दसऱ्याच्या दिवशी आदिपुरुष चित्रपटाचा एक टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र या टीझरमध्ये दाखवल्या गेलेल्या दृश्यांवर जोरदार टीका झाली आणि अखेर निर्मात्यांनी या चित्रपटाच्या दृश्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. आता हा चित्रपट १६ जून रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल.

Web Title: Devdutta Nage got so much remuneration for the movie 'Adipurush', he himself revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.