छत्रपती संभाजीराजेंवरील छावा सिनेमाचा वाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 13:16 IST2025-01-27T13:15:28+5:302025-01-27T13:16:23+5:30

'छावा' सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवल्याने वाद निर्माण झाला आहे.

Devendra Fadnavis Reaction On Vicky Kaushal Chhaava Movie | छत्रपती संभाजीराजेंवरील छावा सिनेमाचा वाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

छत्रपती संभाजीराजेंवरील छावा सिनेमाचा वाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Chhaava Movie Controversy: अभिनेता विकी कौशलची (Vicky Kaushal) मुख्य भूमिका असलेल्या 'छावा' (Chhaava Movie) चित्रपट सध्या चर्चेत आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटात विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. ट्रेलरमधील त्याच्या अभिनयाचं जोरदार कौतुक होत आहे. पण, छत्रपती संभाजी महाराजांना (Sambhaji Raje Chhatrapati) नृत्य करताना दाखवल्याने वाद निर्माण झाला आहे.  एका दृश्यात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल लेझीम खेळताना दिसून आला. लेझीमचा हा सीन हटवल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका काहींनी घेतली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

काल प्रजासत्ताक दिनी देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माध्यमांकडून त्यांना छावा सिनेमाचा वाद सुरू आहे. यात सरकारची काय भुमिका आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर देवेंद्र फडणवीस उत्तर देत म्हणाले, "सरकारची यात काही भुमिका नाही. पण, आम्ही हे मानतो की छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे, तो योग्य दाखवला जावा. विकृतीकरण करणं योग्य नाही. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सर्वांच्या मनात सन्मान आहे, खूप प्रेम आहे. त्याला कुठेही ठेच पोहोचली नाही पाहिजे. क्रिएटिव्हीटी केली पाहिजे, पण  क्रिएटिव्हीटीसोबत सेंसिटिव्हीटीही असायला हवी, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.


दरम्यान,  'छावा'वरुन निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी आज दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी योग्य मार्गदर्शन केलं आहे.  ज्या सीन्सवरुन वाद सुरू आहे, ते आम्ही डिलीट करणार आहोत. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू  नाही, असं माध्यमांशी बोलताना सांगितलं. 

'छावा' या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना  (Rashmika Mandanna) आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका आहेत. विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांच्या, रश्मिका मंदाना ही महाराणी येसुबाई भोसलेंच्या आणि अक्षय खन्ना हा औरंगजेबच्या भूमिकेत आहे. येत्या 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट देशभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Devendra Fadnavis Reaction On Vicky Kaushal Chhaava Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.