देवानंद यांचा नातू ऋषी लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 20:20 IST2019-02-06T20:20:00+5:302019-02-06T20:20:00+5:30
दिवंगत अभिनेते देवानंद यांचा नातू ऋषी आनंद बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

देवानंद यांचा नातू ऋषी लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
दिवंगत अभिनेते देवानंद यांचा नातू ऋषी आनंद बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो गोविंदाचा गाजलेला चित्रपट 'साजन चले ससूराल'च्या रिमेकमधून रुपेरी पडद्यावर एन्ट्री करणार आहे. या चित्रपटाबाबत तो खूप उत्सुक असल्याचे त्याने सांगितले.
ऋषी आनंद म्हणाला की, 'साजन चले ससूराल २' या चित्रपटाबाबत मी खूपच उत्साही आहे. मात्र आता याबाबत बोलणे योग्य ठरणार नाही.
'साजन चले ससूराल' चित्रपट १९९६ साली प्रदर्शित झाला होता. हा विनोदी चित्रपट असून यात गोविंदा, करिश्मा कपूर, तब्बू, कादरखान आणि सतीश कौशक यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन डेविड धवन यांनी केले होते. हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. आता या चित्रपटाचा सीक्वल येतो आहे आणि या चित्रपटात ऋषीसोबत चंकी पांडे, आर्य बब्बर, हेमंत पांडे, सोनल मोन्टेरिओ आणि इशिता राज यांच्या मुख्य भूमिका आहेत. मन्सूर अहमद सिद्दीकी यांनी पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाच्या सीक्वलची निर्मितीही सिद्दीकी करणार आहेत.
ऋषी हा अभिनेता - निर्माता सुनिल आनंद यांचा मुलगा आहे. देवनंद यांचा एकमेव मुलगा असलेल्या सुनिल यांनी 'आनंद और आनंद', 'कार थिफ' आणि मैं तेरे लिए या चित्रपटात काम केले होते. त्यांनी 'मास्टर' आणि 'वेगाटर मिक्सर' या इंग्रजी चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते. ऋषी आपल्या अभिनयाने रसिकांना भुरळ पाडण्यात यशस्वी होईल का हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.