हिरे व्यापा-याच्या हत्याप्रकरणात अडकली ‘गोपी बहू’! लवकरच करणार खुलासा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 03:58 PM2018-12-09T15:58:57+5:302018-12-09T16:01:45+5:30
‘गोपी बहू’ म्हणून घराघरांत ओळखली जाणारी अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्य सध्या एका हिरे व्यापा-याच्या मृत्यूप्रकरणात अडकली आहे. हि-यांचे व्यापारी राजेश्वर उडानी गत २८ नोव्हेंबरपासून गायब होते. गत शुक्रवारी त्यांचा मृतदेह आढळला.
‘गोपी बहू’ म्हणून घराघरांत ओळखली जाणारी अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्य सध्या एका हिरे व्यापा-याच्या मृत्यूप्रकरणात अडकली आहे. हि-यांचे व्यापारी राजेश्वर उडानी गत २८ नोव्हेंबरपासून गायब होते. गत शुक्रवारी त्यांचा मृतदेह आढळला. या राजेश्वर यांच्या फोन रेकॉर्डमध्ये देवोलिनाचे नाव आढळले होते. त्यामुळे पोलिसांनी देवोलिनाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यामुळे ‘गोपी बहू’च्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
पण आता ‘गोपी बहू’ने स्वत: या प्रकरणाबाबत खुलासा करणार आहे. होय, इंडिया टुडेसोबत बोलताना देवोलिनाने या प्रकरणावर तूर्तास कुठलाही खुलासा करण्यास नकार दिला. पण लवकरच एक पत्रपरिषद घेऊन त्यात सर्व प्रश्नांची उत्तर देणार असल्याचे स्पष्ट केले. मी सध्या या प्रकरणावर काहीही बोलू शकत नाही. कारण माझ्या वकिलाने मला काहीही बोलण्यास मनाई केली आहे. येत्या २ ते ३ दिवसांत सगळे काही ठीक झाल्यानंतर मी एक पत्रपरिषद घेणार आहे, असे तिने सांगितले. मी सध्या माझ्या घरी आहे. सुरक्षित आहे. चिंतेचे कारण नाही. ती केवळ एक सामान्य चौकशी होती, असेही तिने स्पष्ट केले.
दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणात देवोलिनाला अद्याप क्लिनचीट दिलेली नाही. या हाय प्रोफाईन हत्याप्रकरणात ५ लाखांची सुपारी देण्यात आली होती. दोन कॉन्ट्रक्ट किलर आणि मॉडेलचा यात वापर करण्यात आल्याचेही म्हटले जात आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात दोघांना अटक झाली आहे. आता ‘गोपी बहू’चे काय होते, ते लवकरच कळेलच.