युजवेंद्र चहल दुसऱ्या तरुणीसोबत दिसताच धनश्री वर्माची इन्स्टा पोस्ट, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 09:06 IST2025-03-11T09:06:19+5:302025-03-11T09:06:52+5:30
युजवेंद्र चहल दुसऱ्या तरुणीसोबत दिसल्यानंतर धनश्री वर्माची इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आली आहे.

युजवेंद्र चहल दुसऱ्या तरुणीसोबत दिसताच धनश्री वर्माची इन्स्टा पोस्ट, म्हणाली...
क्रिकेटपटू युजवेंद्र चहल ( Yuzvendra Chaha) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगलेली असताना दुसरीकडे तो एका सुंदर तरुणीसोबत दिसला आहे. दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही चहल एका तरुणीसोबत बसून सामना पाहताना दिसला. यानंतर तो तिला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच आता धनश्री वर्माने इन्स्टाग्रामवर सूचक स्टोरी ठेवली आहे.
युझवेंद्र चहल एका तरुणीसोबत एकत्र दिसल्यानंतर धनश्री वर्माने तिच्या इन्स्टाग्रामवरुन सूचक स्टोरी पोस्ट केली आहे. तिने स्टोरीमध्ये लिहलं, "स्त्रीयांना दोष देणे ही कायमच फॅशन राहिलेली आहे". यावरुन चहलने धनश्रीला धोका दिलाय का, असे त्यांचे चाहते विचारत आहेत.
दुबईत रंगलेल्या सामन्यात युजवेंद्र ज्या 'मिस्ट्री गर्ल'सोबत दिसला, तिचं नाव माहवश (Mystery Girl RJ Mahvash) असं आहे. ती एक प्रसिद्ध रेडियो जॉकी आहे. सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 1.7 मिलियन फॉलोअर्स आहे. ती प्रँक व्हिडिओ देखील बनवते. तिनेही चहलसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आता दोघांना एकत्र पाहिल्यानंतर अफेअरच्या चर्चांनी जोर धरला आहे. विशेष म्हणजे याआधीही ते दोघे अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. पण दोघांनी देखील त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.
युजवेंद्र आणि धनश्रीबद्दल बोलायचं झालं तर एकमेकांना अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. २०२० मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. पण, आता लग्नाच्या चार वर्षानंतर दोघे वेगळे होत असल्याची चर्चा सुरू आहेत. युजवेंद्र आणि धनश्री या दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एकमेकांना अनफॉलो केलं आहे. युजवेंद्रनं इन्स्टाग्रामवरील धनश्रीसोबतचे फोटो डिलीट केले आहेत. दोघांनी देखील त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.