डोळ्यांवर गॉगल, वाढलेले केस अन् दाढी; बदललेल्या लूक 'या' अभिनेत्याला ओळखणं झालंय कठीण, तुम्ही ओळखलंत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 14:22 IST2023-05-29T13:45:53+5:302023-05-29T14:22:19+5:30
त्याचा हा व्हिडीओ पाहून सर्व हैराण झाले आहेत आणि कोणीही सहज ओळखू शकत नाही.

डोळ्यांवर गॉगल, वाढलेले केस अन् दाढी; बदललेल्या लूक 'या' अभिनेत्याला ओळखणं झालंय कठीण, तुम्ही ओळखलंत का?
अभिनेते व अभिनेत्रींचे एअरपोर्टवरील अनेक व्हिडीओ आणि फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ऐवढंच नाही तर त्यांच्या एअरपोर्टवरील लूकही चाहत्यांमध्ये चर्चेत येत असतो. अशाच एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल होतोय. पण, यात त्याला ओळखणं अनेकांना अवघड झालंय. याच कारण त्याने आपल्या आगामी सिनेमासाठी केस आणि दाढी वाढवली आहे.
व्हिडीओमध्ये या अभिनेत्याने कॅज्युअल पँट आणि हुडी घातलेली दिसते तसेच डोळ्यांवर त्याने गॉगलही लावलेला दिसतोय. त्याचे केस आणि दाढीही वाढलेली दिसत आहे. चाहते त्याच्यासोबत एअरपोर्टवर सेल्फी काढत आहे. विरल भयानीने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
व्हिडीओत दिसणारा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून साऊथचा सुपरस्टार धनुष आहे. धनुषने स्वतःच काही दिवसांपूर्वी त्याचा या लूकमधील फोटो शेअर केले होते. अभिनेत्याचे हे फोटो पाहून सर्व हैराण झाले आहेत आणि धनुषला कोणीही सहज ओळखू शकत नाही. पण, या लूकसह तो कोणत्या चित्रपटात दिसेल, याची त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.