'खोटं बोलणं बंद करा', कपलचा दावा धनुष आहे त्यांचा मुलगा; अभिनेत्याने पाठवली नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 12:25 PM2022-05-21T12:25:59+5:302022-05-21T13:04:46+5:30
Dhanush Paternity Case : मदुरईच्या कॅथिरेसन आणि मीनाक्षीने स्वत:ला धनुषचे आई-वडील म्हटलं होतं. कपलचं बोलणं फेटाळत धनुष आणि त्याचे वडील कस्तुरी राजाने त्यांना लीगल नोटीस पाठवली होती.
गेल्या काही वर्षांपासून साऊथचा सुपरस्टार धनुष (Dhanush) अनेक कारणांनी चर्चेत आहे. काही वर्षापूर्वी मदुरईच्या एका कपलने दावा केला होता की धनुष त्यांचा मुलगा आहे. हे प्रकरण जवळपास ५ वर्ष जुनं आहे. ज्याबाबत मद्रास हायकोर्टाकडून अभिनेता धनुषला समन पाठवण्यात आला होता. कोर्टाचं समन मिळाल्यानंतर धनुषने सुद्धा कपलविरोधात अॅक्शन घेतली.
मदुरईच्या कॅथिरेसन आणि मीनाक्षीने स्वत:ला धनुषचे आई-वडील म्हटलं होतं. कपलचं बोलणं फेटाळत धनुष आणि त्याचे वडील कस्तुरी राजाने त्यांना लीगल नोटीस पाठवली होती. धनुषकडून ही लीगल नोटीस त्याचे वकिल एस हाजा मोहिदीनी गिष्टी यांनी पाठवली. नोटिसच्या माध्यमातून कपलला म्हणाले की, त्यांनी अशाप्रकारच्या खोट्या गोष्टी करू नये.
कपलला पाठवण्यात आलेल्या नोटिसमध्ये सांगण्यात आलं की, 'माझे क्लाएंट तुम्हा दोघांनाही त्यांच्या विरोधात खोटे, अक्षम्य आणि मानहानिकारक आरोप लावण्यापासून वाचण्याची विनंती करत आहेत. जर तुम्ही असं केलं नाही तर माझे क्लाएंट आपल्या अधिकारांची रक्षा करण्यासाठी आणि तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी कोर्टात जातील. तुमच्याकडून करण्यात आलेले खोटे आरोप त्यांच्या प्रतिष्ठेचं नुकसान करत आहेत. ज्यासाठी तुमच्यावर मानहानिची केस चालवली जाईल'.
एका रिपोर्टनुसार, कॅथिरेसन आणि मीनाक्षी म्हणाले की, धनुष त्यांचा मुलगा आहे. ते असंही म्हणाले की, धनुष त्यांचा तिसरा मुलगा आहे. जो सिनेमात काम करण्यासाठी घरातून पळून गेला होता. कॅथिरेसनचा आरोप आहे की, धनुषने कोर्टात चुकीची पॅटर्निटी टेस्ट रिपोर्ट सादर केला होता.