कंगना पाठोपाठ धर्मेन्द्र यांनी डिलीट केले शेतकरी आंदोलनावरचे ट्वीट, सांगितले कारण  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 04:35 PM2020-12-04T16:35:59+5:302020-12-04T16:37:52+5:30

धर्मेन्द्र यांनीही शेतकरी आंदोलनावर ट्वीट केले आणि काही तासानंतर ते डिलीटही केले. साहजिकच धर्मेन्द्र यांनी ट्वीट का डिलीट केले असावे, यावरून चर्चा सुरु झाली.

dharmendra deol deleted his tweet on farmer protest why he did so | कंगना पाठोपाठ धर्मेन्द्र यांनी डिलीट केले शेतकरी आंदोलनावरचे ट्वीट, सांगितले कारण  

कंगना पाठोपाठ धर्मेन्द्र यांनी डिलीट केले शेतकरी आंदोलनावरचे ट्वीट, सांगितले कारण  

googlenewsNext
ठळक मुद्देट्रोल करणा-या एका युजरच्या कमेंटला उत्तर देताना धर्मेन्द्र यांनी ट्वीट डिलीट करण्यामागचे कारण स्पष्ट केले.

शेतकरी आंदोलनावर अभिनेत्री कंगना राणौतचे ट्वीट केले आणि यावरून सोशल मीडियावर राडा सुरु झाला. राडा सुरु होताच कंगनाने ते ट्वीट डिलीट केले. पण तोपर्यंत ते व्हायरल झाले होते. आता बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्र यांनीही शेतकरी आंदोलनावर ट्वीट केले आणि काही तासानंतर ते डिलीटही केले. साहजिकच धर्मेन्द्र यांनी ट्वीट का डिलीट केले असावे, यावरून चर्चा सुरु झाली. मग काय, यानंतर धर्मेन्द्र यांनी स्वत: ट्वीट डिलीट करण्यामागचे कारण स्पष्ट केले.

डिलीट केले, पण स्क्रिनशॉट व्हायरल झाला
धर्मेन्द्र यांनी शेतकरी आंदोलनावरचे ट्वीट डिलीट केले खरे पण त्याआधीच त्याचा स्क्रिनशॉट व्हायरल झाला होता.  ‘सरकार से प्रार्थना है, किसान भाईयों की प्रॉब्लेम का कोई हल जल्दी तलाश कर लें. कोरोना केसेस दिल्ली में बढते जा रहे है. इट इज पेनफुल,’ असे ट्वीट धर्मेन्द्र यांनी केले होते.

लोक म्हणाले, काही तर कारण असेल
धर्मेन्द्र यांनी ट्वीट डिलीट करताच युजर्सनी धर्मेन्द्र यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. ‘पंजाबी आयकॉन धर्मेन्द्र पाजी यांनी 13 तासांपूर्वी हे ट्वीट केले आणि नंतर ते डिलीट केले. काही तर अगतिकता असेल. असेच कोणी विश्वासघात करत नाही,’ असे एका युजरने लिहिले.

धर्मेन्द्र यांनी सांगितले ट्वीट डिलीट करण्याचे कारण
ट्रोल करणा-या एका युजरच्या कमेंटला उत्तर देताना धर्मेन्द्र यांनी ट्वीट डिलीट करण्यामागचे कारण स्पष्ट केले. तुमच्या अशाच कमेंट्समुळे मी माझे ट्वीट डिलीट केले होते. वाट्टेल तितक्या शिव्या घाला. तुम्हाला यात आनंद मिळेत असेल तर तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे. हो, मी माझ्या शेतकरी बांधवांसाठी दु:खी आहे. सरकारने लवकर यावर तोडगा काढायला हवा. आमची कोणाबद्दल काहीही तक्रार नाही, असे धर्मेन्द्र यांनी लिहिले. यावर संबंधित युजरनेही लगेच उत्तर दिले. ‘पाजी, मी तुम्हाला शिव्या दिलेल्या नाहीत. तुम्ही शेतक-यांच्या बाजूने ट्वीट केल्याचे पाहून आनंद झाला होता. नंतर ते ट्वीट डिलीट झालेले दिसले. तेच लक्षात आणून देत होतो,’असे या युजरने लिहिले.

Kangana Vs Diljit : अभिनेत्याला मिळाला बॉलिवूडचा सपोर्ट, म्हणाले - हिंदुस्तान आणि पंजाबची शान....

ले पंगा! वाढता विरोध पाहता कंगना रनौतची पलटी, म्हणाली - मी शेतकरी आणि पंजाबी लोकांसोबत....

Web Title: dharmendra deol deleted his tweet on farmer protest why he did so

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.