'प्रेमाच्या दुनियेत' हरवून गेले हेमा मालिनी अन् धर्मेंद्र; 44 वर्षानंतर पुन्हा केलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 09:43 AM2024-05-03T09:43:03+5:302024-05-03T09:44:06+5:30
Dharmendra-hema malini: हेमा मालिनी यांनी धर्मेंद्रसाठी एक खास पोस्टही शेअर केली आहे. ज्यात त्यांनी त्यांचं प्रेम व्यक्त केलं आहे.
बॉलिवूडचा हीमॅन अर्थात धर्मेंद्र 9dharmendra) यांचा कलाविश्वातील वावर पूर्वीपेक्षा बराच कमी झाला आहे. अगदी मोजक्या एखाद्या सिनेमात ते दिसतात. पण, सोशल मीडियावर ते कमालीचे अॅक्टीव्ह असतात. त्यामुळे या माध्यमातून ते कायम त्यांच्याविषयीचे अपडेट चाहत्यांना देतात. धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीसोबत (hema malini) दुसरा संसार थाटला असून नुकतीच त्यांच्या लग्नाला ४४ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने या जोडीने पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली.
धर्मेंद्र यांच्या वैवाहिक जीवनाविषयी तर साऱ्यांनाच ठावूक आहे. प्रकाशकौरसोबत पहिलं लग्न झालेलं असतांनाही त्यांनी हेमा मालिनीसोबत दुसरा संसार थाटला. विशेष म्हणजे त्यांच्या लग्नाला ४४ वर्ष पूर्ण झाली असून या जोडीने पुन्हा एकदा लग्नाचा घाट घातल्याचं पाहायला मिळालं. हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर त्यांच्या वेडिंग अॅनिव्हर्सरीचे काही फोटो शेअर केले आहेत.
Photos from today at home pic.twitter.com/JWev1pemnV
— Hema Malini (@dreamgirlhema) May 2, 2024
यात धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्नाच्या ४४ वर्षानंतर पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये दोघांच्याही गळ्यात हार दिसून येत आहेत. विशेष म्हणजे इतकी वर्ष एकमेकांची साथ दिल्याचा आनंदही त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे. हेमा मालिनीप्रमाणेच धर्मेंद्र यांनीही इन्स्टाग्रामवर हेमा मालिनीसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
"आमच्या लग्नाच्या वाढदिवसाचे काही खास फोटो", असं कॅप्शन देत हेमा मालिनी यांनी हे फोटो शेअर केले आहेत. सोबतच त्यांनी एक व्हिडीओदेखील शेअर केला होता. "आमच्या लग्नाचा ४४ वा वाढदिवस. या सगळ्या प्रवासात आम्हाला दोन सुंदर मुली आणि नातवंडांची साथ मिळाली. प्रेमाच्या दुनियेत आम्ही हरवून गेलोय. चाहत्यांचं प्रेम असंच कायम असू देत. आयुष्यात याच्याशिवाय मी अजून काय मागणार. इतकं सुंदर गिफ्ट देण्यासाठी देवाचे मनापासून आभार", असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं होतं.