'पैरो मे भी दम नही...' धर्मेंद्र यांनी शायरीतून दिली तब्येतीची माहिती; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 15:34 IST2023-09-26T15:33:05+5:302023-09-26T15:34:19+5:30
८७ वर्षीय धर्मेंद्र नुकतेच अमेरिकेहून परतले आहेत.

'पैरो मे भी दम नही...' धर्मेंद्र यांनी शायरीतून दिली तब्येतीची माहिती; Video व्हायरल
बॉलिवूडचे हँडसम अभिनेते धर्मेंद्र नुकतेच अमेरिकेहून परतले आहेत. सनी देओलसोबत त्यांनी अमेरिकेत वेळ घालवला, खूप एन्जॉय केलं. त्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नुकतेच ते करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात दिसले. वयाच्या ८७ व्या वर्षीही त्यांचा उत्साह तरुणांसारखाच आहे. मात्र आता ते थकले असल्याचं त्यांनी स्वत:च कबूल केलंय. शायरीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या तब्येतीचे हाल सांगितले आहेत.
धर्मेंद्र त्यांचा जास्तीत जास्त वेळ फार्महाऊसवर घालवतात. तिथे ते कधी गाडी चालवतात कर कधी शेतात असतात तर कधी वर्कआऊटही करतात. ते अनेकदा सोशल मीडियावर व्हिडिओही शेअर करतात, सिनेमांचे किस्से सांगतात. नुकतंच त्यांनी व्हिडिओ शेअर करत शायरी सादर केली. ते म्हणतात, 'तो सुनिए जनाब मै क्या लिखता हूँ...आँखे रंग नहीं पहचानती, कहता है ले चल चमन में...कोई समझाए दिल-ए-नादान को, अब तो पैरो मे भी दम नही है! ' या व्हिडिओला कॅप्शन देत त्यांनी लिहिले,'ऐ हकीकत ऐ जिंदगी...मै जवान हूँ अभी..!
Ae haqeeqat e zindagi………main jwaan hoon abhi 🙏 pic.twitter.com/wvZwQ6VKEk
— Dharmendra Deol (@aapkadharam) September 26, 2023
काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली होती. त्यांना अमेरिकेत उपचारासाठी नेण्यात आल्याची अफवा पसरली. मात्र नंतर सनी देओलने या अफवांचं खंडन केलं आणि ते व्यवस्थित असल्याचं सांगितलं. सनी वडिलांना काही दिवस बदल म्हणून अमेरिकेला घेऊन गेल्याचं नंतर समोर आलं.