अब मैं आपको कभी भी परेशान नहीं करूंगा... ! धर्मेन्द्र यांनी सोशल मीडियाला म्हटले अलविदा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 02:31 PM2019-07-11T14:31:44+5:302019-07-11T14:34:23+5:30
2017 साली ‘यमला पगला दीवाना 3’च्या रिलीजवेळी धर्मेन्द्र यांनी सोशल मीडियावर पदार्पण केले होते. त्यावेळी त्यांचे वय 81 वर्षे होते. चाहत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले होते. पण अचानक असे काय झाले की, धर्मेन्द्र यांनी सोशल मीडियाला रामराम ठोकला.
ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्र यांचे जगाच्या पाठीवर असंख्य चाहते आहेत. याच चाहत्यांना धर्मेन्द्र यांनी एक जोरदार धक्का दिला. होय, सोशल मीडियाला अलविदा म्हणत धर्मेन्द्र यांनी चाहत्यांमध्ये खळबळ निर्माण केली. 2017 साली ‘यमला पगला दीवाना 3’च्या रिलीजवेळी धर्मेन्द्र यांनी सोशल मीडियावर पदार्पण केले होते. त्यावेळी त्यांचे वय 81 वर्षे होते. चाहत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले होते. पण अचानक असे काय झाले की, धर्मेन्द्र यांनी सोशल मीडियाला रामराम ठोकला. तूर्तास तरी काही ट्रोलर्सच्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे व्यथित होऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याचे भासतेय.
Friends, love you all, I get hurt by a single small bad comment . I am an emotional person,So I won’t trouble you any more 🙏 pic.twitter.com/MnAnPY1POM
— Dharmendra Deol (@aapkadharam) July 10, 2019
धर्मेन्द्र यांनी ट्विटरवर एक भावूक पोस्ट लिहून सोशल मीडियावर एक्झिट घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. ‘मित्रांनो, मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो. एका छोट्या कमेंटनेही मी दुखावला जोतो. कारण मी एक अतिशय संवेदनशील व भावूक व्यक्ति आहे. मी यापुढे तुम्हाला आणखी त्रास देणार नाही,’ असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले.
Aap sab ko padte padte...mann bhar aya.....Aap KI mohabbat paane ke liye actor bana tha ....Ji bhar ke...jo di hai mujhe aap ne .....tanhaiyaan .....suni ho chali thien ....aap se door .....ab kiya jaon ga.....kahan jaon ga .........A big hug to you all. pic.twitter.com/neaudIqSc2
— Dharmendra Deol (@aapkadharam) July 11, 2019
त्यांच्या या पोस्टवरून एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे काही लोकांच्या निगेटीव्ह कमेंट्समुळे ते खोलवर दुखावले गेले आहेत. अलीकडे मुलगा सनी देओल राजकारणात उतरल्यावर त्यांना ट्रोल केले गेले होते. सध्या धर्मेन्द्र यांनी अभिनयातून विश्रांती घेतली आहे. लाईमलाईटपासून दूर होत त्यांनी शेतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. आता ते त्यांचा संपूर्ण वेळ फार्म हाऊसवर घालवतात.
१९३५ मध्ये पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील एका गावात धर्मेंद्र यांचा जन्म झाला. १९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या सिनेमातून धमेंद्र यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी ‘बंदिनी’, ‘फूल और पत्थर’, ‘अनुपमा’, ‘चुपके चुपके’ आणि ‘शोले’ यांसारख्या सिनेमात काम केले. १९६० साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेद्र यांनी आता पर्यंतसुमारे २५० हून अधिक सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.