​धर्मेन्द्र-सनी-बॉबी देओल परतणार! ‘यमला पगला दिवाना3’ येणार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2017 08:56 AM2017-07-03T08:56:39+5:302017-07-03T14:26:39+5:30

देओल फॅमिलीचे चाहते असाल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक फक्कड बातमी आहे. होय, देओल फॅमिली पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार ...

Dharmendra-Sunny-Bobby Deol will return! 'Yamla Pagla Diwana 3' will come !! | ​धर्मेन्द्र-सनी-बॉबी देओल परतणार! ‘यमला पगला दिवाना3’ येणार!!

​धर्मेन्द्र-सनी-बॉबी देओल परतणार! ‘यमला पगला दिवाना3’ येणार!!

googlenewsNext
ओल फॅमिलीचे चाहते असाल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक फक्कड बातमी आहे. होय, देओल फॅमिली पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ‘यमला पगला दिवाना3’ लवकरच येतोय आणि यात धर्मेन्द्र, सनी देओल आणि बॉबी देओल ही तिकडी पुन्हा एकदा आपल्याला दिसणार आहे. खुद्द धर्मेन्द्र यांनी ही गोड बातमी दिली आहे.

‘यमला पगला दिवाना3’चे शूटींग लवकरच सुरु होणार आहे. हा एक चांगला चित्रपट ठरेल, यात शंका नाही. यातील व्यक्तिरेखा अतिशय मनोरंजक आहेत, असे त्यांनी सांगितले.
‘यमला पगला दिवाना’चा पहिला भाग बॉक्सआॅफिसवर चांगलाच हिट ठरला होता. मात्र दुसºया भागाला बॉक्सआॅफिसवर फार यश मिळाले नव्हते. याऊपरही देओल फॅमिली या चित्रपटाचा तिसरा भाग घेऊन येतेय. याबाबतही धर्मेन्द्र बोलले. ते म्हणाले की,‘यमला पगला दिवाना2’  चालणार नाही, हे मला ठाऊक होते. या चित्रपटाचा ट्रेलर आला तेव्हाच मी सनीला हा चित्रपट गेला, असे म्हणालो होतो. पहिल्या भागात आपण लोकांना खूप हसवले पण दुसºया भागामुळे आपण रडणार, हे माझे शब्द खरे ठरले म्हणायचे.

ALSO READ : सनी देओलच्या मुलाच्या चित्रपटाची शूटिंग बघण्यासाठी उसळली गर्दी!!

८१ वर्षांचे धर्मेन्द्र्र सध्या त्यांचा पहिला इंटरनॅशनल प्रोजेक्ट ‘ड्रिम कॅचर’मध्ये बिझी आहेत. सनी हा सुद्धा त्याचा मुलगा करण देओल याच्या बॉलिवूड डेब्यू चित्रपटात बिझी आहे. करण देओल ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करतो आहे. हा चित्रपट स्वत: सनी दिग्दर्शित करतो आहे. हे सगळे प्रोजेक्ट हातावेगळे केल्यानंतर धर्मेन्द्र व सनी दोघेही  ‘यमला पगला दिवाना3’चे शूटींग सुरु करणार आहेत.  

Web Title: Dharmendra-Sunny-Bobby Deol will return! 'Yamla Pagla Diwana 3' will come !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.