Dharmendra Birthday: सनी अन् बॉबी देओलने साजरा केला वडिलांचा वाढदिवस, हेमा मालिनी यांचीही खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 15:06 IST2024-12-08T15:05:54+5:302024-12-08T15:06:23+5:30
हेमा मालिनी यांनी सुंदर पोस्टमधून धर्मेंद्र यांच्यावरचं प्रेम व्यक्त केलं आहे.

Dharmendra Birthday: सनी अन् बॉबी देओलने साजरा केला वडिलांचा वाढदिवस, हेमा मालिनी यांचीही खास पोस्ट
'हिमॅन' अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) आज ८८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांची दोन्ही मुलं सनी आणि बॉबी देओल त्यांच्यासोबत आहेत. सोशल मीडियावर धर्मेंद्र यांचा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ते पापाराझींसमोर वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. सर्व स्तरांतून त्यांना शुभेच्छा मिळत आहेत.
धर्मेंद्र यांच्या वाढदिवसासाठी खास सेलिब्रिशेनचं आयोजन करण्यात आलं आहे. सनी आणि बॉबी वडिलांना घेऊन घराखाली आले. धर्मेंद्र यांनी शर्ट, पँट आणि जॅकेट परिधान केलं होतं. शिवाय डोक्यावर हॅट होती. नेहमीप्रमाणेच ते एकदम कूल अंदाजात दिसले. पापाराझींसमोर त्यांनी केक कापला. बॉबी आणि सनीसोबत फोटो काढले. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय.
धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले, " माझ्या स्वप्नातील राजकुमाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अनेक वर्षांपूर्वी आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हापासून जसं माझं हृदय तुमच्यापाशी आहे तसंच तुमचं माझ्याजवळ आहे. आपण चांगले, वाईट सर्व क्षणातून गेलो, सोबत राहिलो आणि आपलं प्रेम कायम राहिलं. तुमचा चार्म पाहून मी आजही मोहित होते. तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो हीच देवाचरणी प्रार्थना"
धर्मेंद्र दरवर्षी कुटुंबासह वाढदिवस साजरा करतात. आता त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. मात्र तरी त्यांच्यातील तारुण्य आझही जीवंत आहे.