हिंमत असेल तर ऐकून दाखवा...! ढिंच्याक पूजाचे ‘नाच के पागल’ गाणे ऐकून व्हाल ‘पागल’!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 12:34 PM2019-07-29T12:34:10+5:302019-07-29T13:07:34+5:30
सेल्फी मैने लेली आज, दिलो का स्कूटर आणि आफ्रीन फातिमा बेवफा यासारख्या आपल्या चित्रविचित्र गाण्यांमुळे ढिंच्याक पूजा चर्चेत आली. या गाण्यांनी अनेक रेकॉर्ड्स बनवले. हीच ढिंच्याक पूजा एक नवे गाणे घेऊन आली आहे.
सोशल मीडियावर अनेक लोक एका रात्रीत स्टार झालेत. या यादीतील असेच एक नाव म्हणजे ढिंच्याक पूजा. सेल्फी मैने लेली आज, दिलो का स्कूटर आणि आफ्रीन फातिमा बेवफा यासारख्या आपल्या चित्रविचित्र गाण्यांमुळे ढिंच्याक पूजा चर्चेत आली. या गाण्यांनी अनेक रेकॉर्ड्स बनवले. सध्या हीच ढिंच्याक पूजा एक नवे गाणे घेऊन आली आहे. ‘नाच के पागल’ असे या गाण्याचे बोल आहेत. जुन्या गाण्यांप्रमाणे तिचे हे गाणेही तुफान व्हायरल होतेय. एवढेच नाही तर या गाण्याने खरोखरच नेटक-यांना ‘पागल’ केले आहे.
या गाण्याची विचित्र चाल, तितके विचित्र चित्रीकरण आणि पूजाचा बेसूर आवाज असे सगळे ऐकून, आता आत्महत्या करायची वेळ आलीय, असे नेटकरी म्हणत आहेत.
Yar please isay koi Goli mar day 😡😡😡😡😠😠😠😠 https://t.co/OwhSpHUUsW
— Robinson Yousaf (@robinsonyousaf) July 25, 2019
‘नाच के पागल, पागल हो के नाचो और नाच नाच के पागल हो जाओ. जहां भी मिले चटिया तुम चादर तान के सो जाओ’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यावर नेटक-यांनी इतक्या भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत की, स्वत: ढिंच्याक पूजालाही वेड लागेल.
Dhinchak Pooja is back 🥺
— Caustic News (@CausticNews) July 26, 2019
Run away! Run fast! Run far!https://t.co/p2JSK12KWe
‘हिंमत असेल तर ढिंच्याक पूजाचे हे अख्खे गाणे ऐकून दाखवा,’ असे आव्हान अनेकांनी दिले आहे. काहींनी तर ढिंच्याक पूजाला पृथ्वी सोडून परग्रहावर जाण्याची विनंती केली आहे.
Evry1 to Dhinchak Pooja rn pic.twitter.com/OlaosPId52
— S Ravind King (@sravindking) July 26, 2019
Why I watched @DhinchakPoojapic.twitter.com/AppbCvEc8q
— Shiv Kulshrestha (@shibu10s) July 28, 2019
ढिंच्याक पूजाचे हे चौथे गाणे आहे. तिच्या पहिल्या तीन गाण्यांनाही लोकांनी असेच ट्रोल केले होते. पण या गाण्यांतून ढिंच्याक पूजाने लाखोंची कमाई केली होती. लोकांनी कितीही ट्रोल केले, माझी कितीही खिल्ली उडवली तरी मी लक्ष देत नाही. मी सोशल मीडियावरच्या नकारात्मक प्रतिक्रिया मुळीच वाचत नाही. असे केल्याने नवीन गाणी सादर करण्याची माझी इच्छा कायम राहते, असे ढिंच्याक पूजा एका मुलाखतीत म्हणाली होती.