​धोनीची एक्स-गर्लफ्रेन्ड लक्ष्मी राय आता कुणावर झाली लट्टू?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2017 01:19 PM2017-01-20T13:19:43+5:302017-01-20T15:02:02+5:30

बॉलिवूड आणि क्रिकेट वर्ल्डचे बरेच जुने नाते आहे. अनेक इंटरनॅशनल क्रिकेट स्टार बॉलिवूड सौंदर्यवतींवर लट्टू झालेले आपण बघितलेय, बघतोयं. ...

Dhoni's X-Girlfriend Lakshmi Rai came in some time? | ​धोनीची एक्स-गर्लफ्रेन्ड लक्ष्मी राय आता कुणावर झाली लट्टू?

​धोनीची एक्स-गर्लफ्रेन्ड लक्ष्मी राय आता कुणावर झाली लट्टू?

googlenewsNext
लिवूड आणि क्रिकेट वर्ल्डचे बरेच जुने नाते आहे. अनेक इंटरनॅशनल क्रिकेट स्टार बॉलिवूड सौंदर्यवतींवर लट्टू झालेले आपण बघितलेय, बघतोयं. यापैकी अझहरूद्दीन-संगीता बिजलानी, हरभजन सिंह-गीता बसरा, युवराज सिंह-हेजल कीच अशा काही जोड्या लग्नबंधनात अडकल्या. पण क्रिकेट आणि बॉलिवूडमधील अशा काही जोड्याही आहेत, ज्यांचे प्रेम खूप गाजले पण त्यांचा पे्रमाचा डाव अर्ध्यावरच संपला. आम्ही बोलतोय, ते कॅप्टन कूल महेन्द्र सिंह धोनी आणि त्याच्या बॉलिवूडमधील लव्ह लेडीबद्दल. होय, दीपिका पादुकोण व महेन्द्र सिंह धोनी यांच्या नात्याची बॉलिवूड व क्रिकेटविश्वात बरीच चर्चा झाली. पण मॉडेल लक्ष्मी राय ही सुद्धा धोनीच्या आयुष्यात आलेल्या एका ‘लव्ह लेडी’पैकी एक होती.



२००८ मध्ये मी व धोनी एकमेकांना डेट करत होतो, असा दावा खुद्द लक्ष्मी राय हिने केला होता. धोनीने यावर चूप राहणे पसंत केले. पण शेवटी ‘बिना आग के धुआं नही उठता’ हेच खरे. धोनी व लक्ष्मी राय यांची ‘लव्ह स्टोरी’ अर्ध्यावरच संपली. धोनी आपल्या आयुष्यात पुढे निघून गेला आणि आता त्याची एक्स गर्लफ्रेन्ड लक्ष्मी ही सुद्धा आयुष्यात पुढे जाऊ पाहतेय. 
Also read : ​​लक्ष्मी राय म्हणतेय, धोनीसोबतचे नाते डागासारखे 

मीडिया रिपोर्टनुसार, लक्ष्मीच्या आयुष्यात सध्या एक नवी व्यक्ती आली आहे. होय, बॉलिवूड कोरिओग्राफर आणि मॉडेल हनीफ हिलाल याला लक्ष्मी डेट करत असल्याची खबर आहे. हनीफने आपले नाव बदलून वीर आर्यन केले आहे. वीर आर्यन याचे नाव लक्ष्मीच्या आधी पूजा बेदी आणि करिश्मा तन्ना या दोघींसोबतही जोडले गेले होते. आता लक्ष्मी व आर्यन किती वेळ प्रेमाच्या पीचवर खेळतात, ते बघूयात!

वीर आर्यन लवकरच विक्रम भट्ट यांच्या ‘माया’ या वेबसीरिजमधून अ‍ॅक्टिंग डेब्यू करतोय. अलीकडे ‘माया’चे ट्रेलर रिलीज झाले.

Web Title: Dhoni's X-Girlfriend Lakshmi Rai came in some time?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.