अशी झाली होती दिया आणि साहिलची लव्हस्टोरी, आता झाला THE END

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 01:50 PM2019-08-01T13:50:04+5:302019-08-01T13:50:54+5:30

दिया मिर्झा आणि साहिल संघा 2014 मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले. आता दोघांनी आपल्या वाट बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

Dia Mirza and husband Sahil Sangha separate after 5 years of marriage | अशी झाली होती दिया आणि साहिलची लव्हस्टोरी, आता झाला THE END

अशी झाली होती दिया आणि साहिलची लव्हस्टोरी, आता झाला THE END

googlenewsNext

दिया मिर्झा आणि साहिल संघा 2014 मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले. आता दोघांनी आपल्या वाट बदलण्याचा निर्णय घेतला आहे. दियाने या गोष्टीचा खुलासा सोशल मीडियाच्या माध्यमातून केला. लग्नाच्या अनेक वर्षे आधीपासून दोघे एकमेकांवना ओळखंत होते. आज आम्ही तुम्हाला  दिया आणि साहिलची लव्हस्टोरी नेमकी कशी सुरु झाली ते सांगणार आहोत.   


दिया आणि साहिल दोघे ही फिल्म इंडस्ट्रीतून आहेत. दोघांची पहिली ओळख 2009 मध्ये झाली होती ज्यावेळी एका सिनेमाची स्क्रिप्ट घेऊन साहिल दियाच्या घरी गेला होता.  त्या छोट्याशा भेटीत साहिलला पाहून दियाच्या मनाची तार छेडली. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी सुरु झाल्या. ब्रुकलेन ब्रिजवर साहिलने दियाला प्रपोज केले होते. 


दिया आणि साहिल एका अॅवॉर्ड फंक्शनसाठी न्यूयॉर्कला गेले होते. याच दरम्यान दोघे ब्रुकलेन ब्रिजवर फिरत होते, ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात कपल्स सनसेट बघायला येतात. पुलाच्या मधोमध साहिल घुडग्यांवर बसला आणि दियाला प्रपोज केले. दियानेही क्षणाचा विलंब न करता साहिलला होकार दिला. लगेचच साहिलने दियाच्या हातात रिंग घातली. यावेळी ब्रुलकेन ब्रिजवर हजर असलेल्या सगळ्या कपल्सनी दोघांना उभं राहून, टाळ्या वाजवून चिअरअप केले. दोघांच्या लग्नाचे सेलिब्रेशन चक्क चार दिवस चालले होते.

सुरुवातीच्या ओळखीनंतर दोघांनी मिळून एक प्रॉडक्शन हाऊस देखील सुरु केले होते. ज्याच्या बनॅर अंतर्गत  ‘लव ब्रेकअप जिंदगी’ सिनेमा तयार करण्यात आला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन ही साहिलने केले होते. यानंतर त्यांनी बॉबी जासूस सिनेमा बनवला. दिया शेवटी संजूमध्ये दिसली होती.

Web Title: Dia Mirza and husband Sahil Sangha separate after 5 years of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.