'माझं बाळ या जगात नाही'; दिया मिर्झाने शेअर केलेल्या भावुक पोस्टमुळे चाहते थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 11:57 AM2022-08-02T11:57:02+5:302022-08-02T11:57:26+5:30

Dia mirza: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या दिया मिर्झाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या भाचीच्या निधनाविषयी भाष्य केलं आहे.

dia mirza niece tanya passes away actress share emotional post on instagram | 'माझं बाळ या जगात नाही'; दिया मिर्झाने शेअर केलेल्या भावुक पोस्टमुळे चाहते थक्क

'माझं बाळ या जगात नाही'; दिया मिर्झाने शेअर केलेल्या भावुक पोस्टमुळे चाहते थक्क

googlenewsNext

गेल्या काही काळापासून अभिनेत्री दिया मिर्झा(dia mirza) तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे सातत्याने चर्चेत येत आहे. दियाने गुपचूप पद्धतीने लग्न केल्यानंतर ती प्रचंड चर्चेत आली होती. त्यानंतर सध्या ती समाजात घडणाऱ्या घटनांवर तिचं मत नोंदवत असल्यामुळे चर्चेत येत आहे. परंतु, यावेळी तिने एक भावुक पोस्ट लिहित नेटकऱ्यांचं लक्ष वेधल आहे. माझं बाळ या जगात नाही, असं म्हणत तिने तिच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या दिया मिर्झाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या भाचीच्या निधनाविषयी भाष्य केलं आहे. भाचीचं अचानकपणे झालेल्या निधनामुळे दिया भावनाविवश झाली असून तिने हे दु:ख शब्दांत मांडलं आहे.
 

“माझी भाची, माझं बाळ आणि माझं मुल आता या जगातच नाही. तू जिथे कुठे असशील तिथे तुला प्रेम आणि शांती मिळो. तू नेहमीच आम्हाला हसवलंस. तू जिथे असशील तिथे तुझं नाचणं, हसणं आणि गाण्याने आनंद बहरेल. ओम शांती,” असं कॅप्शन देत दियाने तिच्या भाचीचा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, दियाच्या भाचीचं नाव तान्या असं असून तिचं कार अपघातात निधन झालं. हैदराबाद येथील राजील गांधी इंटरनॅशनल विमानतळावरुन तान्या घरी परत येत असताना तिच्या कारचा अपघात झाला. या अपघातानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
 

Web Title: dia mirza niece tanya passes away actress share emotional post on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.