अभिनेत्रीने शेअर केला असा फोटो तर नेटीझन्स म्हणाले " ओ स्त्री है कुछ भी कर सकती है"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 04:03 PM2021-02-17T16:03:22+5:302021-02-17T16:04:12+5:30
कॉकटेल हिट गेल्यानंतर डायना चार वर्षांनी हॅपी भाग जाएगी सिनेमात दिसली. हा एक कॉमेडी सिनेमा होता. याशिवाय डायना, लखनऊ सेंट्रल, परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण, हॅपी फिर भाग जाएगी, खानदानी शफाखाना सारख्या सिनेमांमध्येही ती झळकली होती.
रिल लाइफमध्ये सुंदर दिसण्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेली अभिनेत्री डायना पेंटी प्रत्यक्ष जीवनात कशी असेल याची कल्पना तुम्ही नक्कीच केली असेल. रिल लाइफमध्ये ज्यारितीने सुंदर दिसतो तितकेच सुंदर आणि लक्षवेधी रिअल लाइफमध्येही दिसावं असा खटाटोप डायनाचाही असतो. त्यामुळे आपल्या स्टाईल, फॅशनबाबत ती बरीच सजग असते. आधीच सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.
डायनाचे फॅन्स तिच्या अभिनयासोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. सोशल मीडियावर सक्रीय असलेली डायना आपले फोटो आणि व्हिडीओ फॅन्ससह शेअर करत असते. ती आपल्या फॅन्सना कधीही निराश करत नाही. दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते. तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो.
त्यावर ते भरभरून लाइक्स आणि कमेंट्स देतात. नुकताच तिने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. सुंदर दिसण्यासाठी चेह-यावर तिने क्रिम लावल्याचे पाहायला मिळत आहे. अशाच अंदाजामधील हा फोटो तिने शेअर केला आणि डायनाचा हा मेजशीर अंदाज लक्षवेधीही ठरत आहे. चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास डायनाच्या या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. या फोटोवर फॅन्सकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे.
डायना 2011 साली इम्तियाज अली याच्या रॉकस्टार सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार होती. मात्र मॉडलिंगच्या कॉन्ट्रॅक्टमुळे तिने या सिनेमासाठी नकार दिला. त्यानंतर रणबीर कपूरच्या अपोझिट या सिनेमात डायनाच्या जागी नरगिस फाखरीला घेण्यात आले.त्यानंतर 2012 मध्ये आलेल्या कॉकटेल सिनेमातून डायनाने डेब्यू केला. इम्तियाज अलीने त्याचे नाव दिग्दर्शक होमी अदजानियाला सुचवले होते. या सिनेमा डायनासोबतदीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत होती.
सिनेमात पदार्पण करण्यापूर्वी डायनाने मॉडलिंग श्रेत्रात आपली छाप सोडली होती. ऐवढेच नाही तर एका जाहिरामध्ये डायनाने दीपिकाला रिप्लेस केले होते. कॉकटेल हिट गेल्यानंतर डायना चार वर्षांनी हॅपी भाग जाएगी सिनेमात दिसली. हा एक कॉमेडी सिनेमा होता. याशिवाय डायना, लखनऊ सेंट्रल, परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण, हॅपी फिर भाग जाएगी, खानदानी शफाखाना सारख्या सिनेमांमध्येही ती झळकली होती.