अवघ्या १४व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने केली लिप सर्जरी? फोटो पाहून नेटकरी संतप्त, म्हणाले- "हिच्या आईला जेलमध्ये..."
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 01:02 PM2024-03-07T13:02:06+5:302024-03-07T13:11:15+5:30
१४व्या वर्षी लिप सर्जरी केल्याने अभिनेत्री ट्रोल, नेटकऱ्यांनी आईलाही सुनावलं
बॉलिवूडमधील कलाकार कायमच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. अनेक सेलिब्रिटी चांगलं दिसण्यासाठी आणि चेहरा रेखीव करण्यासाठी सर्जरी करतात. अशीच एक बालकलाकार लिप सर्जरीमुळे चर्चेत आली आहे. अवघ्या १४ व्या वर्षी अभिनेत्री रीवा अरोराने लीप सर्जरी केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अरोराच्या इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमुळे तिने लीप सर्जरी केली आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
रीवाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे. एवढ्या कमी वयात सर्जरी केल्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्या आईलाही खडे बोल सुनावले आहेत. एकाने कमेंट करत "१४व्या वर्षी २५ वर्षांची का दिसायचं आहे?" असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "हिच्या आईला जेलमध्ये पाठवलं पाहिजे," अशी कमेंट केली आहे. तर काहींनी रीवाने हार्मोनल इंजेक्शन घेतल्याचंही म्हटलं आहे.
रीवा अरोराने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती. २०११ साली प्रदर्शित झालेल्या 'रॉकस्टार' या रणबीर कपूरच्या सिनेमात ती झळकली होती. त्यानंतर 'नैना' या सिनेमात तिने भूमिका साकारली होती. तिने हॉलिवूड सिनेमातही काम केलं आहे. रीवाने अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे. 'गुंजन सक्सेना', 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक', 'मॉम' या सिनेमांमध्ये ती झळकली आहे.