जान्हवी कपूर आणि सारा तेंडुलकरमध्ये शिखरवरुन कॅट फाइट? अभिनेत्रीने सचिनच्या लेकीला केलं अनफॉलो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 15:47 IST2024-01-10T15:47:22+5:302024-01-10T15:47:48+5:30
सारा आणि शिखरचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता जान्हवीने तिला अनफॉलो केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

जान्हवी कपूर आणि सारा तेंडुलकरमध्ये शिखरवरुन कॅट फाइट? अभिनेत्रीने सचिनच्या लेकीला केलं अनफॉलो
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. जान्हवीने कॉफी विथ करणमध्ये प्रेमाची कबुली देत बॉयफ्रेंड शिखर पडाडियाबाबत पहिल्यांदाच भाष्य केलं होतं. त्यानंतर जान्हवी आणि शिखरच्या नात्याबाबतच जोरदार चर्चा सुरू होत्या. अशातच शिखरचा सारा तेंडुलकरबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एका पार्टीला जाताना शिखर आणि साराला स्पॉट करण्यात आलं होतं. एकाच गाडीतून शिखर आणि सारा पार्टीसाठी जात होते. याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
सारा आणि शिखरचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी याचे अनेक अर्थ काढले होते. या व्हिडिओनंतर आता जान्हवीने सारा तेंडुलकरला अनफॉलो केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. जान्हवीच्या इन्स्टाग्राम फॉलोविंगच्या लिस्टमधून सारा गायब झाली आहे. जान्हवीने तिला अनफॉलो केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे सारा आणि जान्हवीमध्ये कॅट फाइल सुरू असल्याचंही बोललं जात आहे.
दरम्यान, जान्हवी गेल्या अनेक वर्षांपासून शिखरला डेट करत आहे. अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. नुकतंच त्यांनी तिरुमल्ला येथील मंदिरात एकत्र दर्शन घेतलं होतं. शिखर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे आणि संजय पहाडिया यांचा तो मुलगा आहे.