कंगनाने ‘तो’ फोटो गुगलवरून चोरला? मीम्स पाहून कंगना बिथरली; म्हणे, यामागे माझा एक लव्हर!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 03:45 PM2021-03-04T15:45:33+5:302021-03-04T15:45:54+5:30
नेटकऱ्यांनी उडवली ब्रेकफास्ट डिशची खिल्ली, कंगना भडकली...
सकाळी सकाळी कंगना राणौतने इन्स्टाग्रामवर तिच्या हेल्दी ब्रेकफास्टचा फोटो शेअर केला. फोटोत एका डिशचा फोटो आहे. डिशचे नाव आहे,स्मूदी. ‘स्वत: बनवलेल्या अन्नापेक्षा मला कशाचेही कौतुक नाही. ही मी बनवलेली माझी स्वत:ची ब्रेकफास्ट रेसिपी समर स्मुदी... खूप सारे मध आणि फळांसह...’, असे या डिशचा फोटो शेअर करताना कंगनाने लिहिले. पण हे काय? या डिशचे फोटो शेअर करताच, सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला.
कारण काय तर, कंगनाने शेअर केलेला डिशचा फोटो तिने गुगलवरून घेतल्याचा संशय लोकांना आला. मग काय, लोकांनी यावरून कंगनाला ट्रोल करणे सुरु केले. यावरचे एकापेक्षा एक भारी मीम्स लोकांनी शेअर केलेत.
बस...बस... इतना सच सुन नहीं सकता, असे लिहित एका युजरने कंगनाच्या ब्रेकफास्ट डिशची खिल्ली उडवली. यामुळे झाले काय तर कंगना भडकली.
अन् कंगना भडकली...
सकाळी सकाळी स्वत:वरचे मीम्स व्हायरल झालेले पाहून कंगना बिथरली. अक्षरश: संतापली. या रागाच्या भरात तिने इन्स्टाग्रामवरही आरोप केला. इन्स्टाग्रामवर पैसे देऊन माझ्याविरोधात निगेटीव्ह कॅम्पेन सुरु आहे. एका आठवड्यात माझे 5 लाख फॉलोअर्स कमी झाल्याचा दावाही तिने केला. इतकेच नाही तर हे सगळे कोण करतेय, हेही तिने सांगितले. कंगनाने एका पाठोपाठ 6ट्वीटस केलेत.
‘कितना तडपते हो यार... ट्रोल आर्मीवर पैसे लावले गेले आहे. मीम्स बनवून माझ्याबद्दल खोटी माहिती पेरण्याची मोहिम चालवली जातेय. मुव्ही माफिया, पॉलिटिकल माफिया, थकलेले अॅक्टर्स आणि रिजेक्टेड लव्हर... एका फ्रूट बाऊलमुळे इतका जळफळाट? उफ्फ...’, असे तिने एका ट्वीटमध्ये लिहिले.
माझ्याविरोधात निगेटीव्ह कॅम्पेन चालवले जातेय. यासाठी पैसे दिले जातात, मीम्स तयार करून दिले जातात. यामागे कोण आहे, हे मला माहित आहे. योग्य वेळ येताच मी नावाचा खुलासा करेन, असेही तिने लिहिले.
एक लव्हर...
आपल्या सहाव्या ट्वीटमध्ये कंगनाने धक्कादायक दावा केला. मला बदनाम करणा-या सोशल मीडियावरच्या मोहिमेमागे एक पुरूष आहे. एक पराभूत प्रेमी... ज्याच्यासोबत अल्पकाळासाठी मी रिलेशनमध्ये होते. तो एक बनावट हाय प्रोफाईल रिलेशनशिप जगतोय. त्याचे खूप चेहरे आहेत. ठोस पुराव्यांसोबत मी त्याचे नाव सांगेन. प्रतीक्षा करा, असे तिने लिहिले.