सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकर बनणार हिरोईन? लवकरच होणार बॉलिवूड डेब्यू?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 11:10 AM2022-04-25T11:10:14+5:302022-04-25T11:11:17+5:30

Sara Tendulkar : साराने सोशल मीडियावर फोटो शेअर केला रे केला की क्षणात तो व्हायरल होतो, इतकी तिची क्रेझ आहे. साराला बॉलिवूड चित्रपटात पाहण्यास तिचे चाहते उत्सुक आहेत आणि या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे.

did Sachin Tendulkar Daughter Sara Tendulkar to make her bollywood debut ? | सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकर बनणार हिरोईन? लवकरच होणार बॉलिवूड डेब्यू?

सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकर बनणार हिरोईन? लवकरच होणार बॉलिवूड डेब्यू?

googlenewsNext

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची  (Sachin Tendulkar) लाडकी लेक सारा तेंडुलकर(Sara Tendulkar) सध्या जाम चर्चेत आहे. सचिनने देशविदेशातील जवळपास प्रत्येक स्टेडियमवर धावांचा पाऊस पाडला, प्रत्येक गोलंदाजाला धूळ चारली. आता त्याची लेक सारा फॅशनच्या बाबतीत बॉलिवूडच्या बड्या बड्या अभिनेत्रींना मात देताना दिसतेय. साराने सोशल मीडियावर फोटो शेअर केला रे केला की क्षणात तो व्हायरल होतो, इतकी तिची क्रेझ आहे. साराला बॉलिवूड चित्रपटात पाहण्यास तिचे चाहते उत्सुक आहेत आणि या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. होय, सारा लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करू शकते.

‘बॉलिवूड लाईफ’ने एका सूत्राच्या हवाल्याने याबाबतचं वृत्त दिलं आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार, साराला अभिनयात रूची आहे. सध्या ती काही ब्रँडच्या जाहिरातींसाठी अ‍ॅक्टिंग शिकते आहे. लंडन युनिव्हर्सिटीत तिने मेडिसीनचा अभ्यासक्रम केला आहे. पण हा अभ्यास बाजूला ठेवत, सारा आता ग्लॅमर दुनियेत करिअर बनवण्याचा विचार करतेय. तशी तयारीही तिने सुरु केली आहे.सारा फारसी प्रकाशझोतात नसते. पण लहानपणापासून ती खूप प्रतिभाशाली आहे. तिने मॉडेलिंगला सुरूवात केलीये आणि लवकरच ती बॉलिवूडमध्ये डेब्यू करू शकते. आपल्या अ‍ॅक्टिंगने ती सर्वांना आश्चर्याचा धक्का देऊ शकते.

मध्यंतरी साराच्या डेब्यूची चर्चा होती. सारा शाहिद कपूरच्या अपोझिट बॉलिवूड डेब्यू करत असल्याचा दावा त्यावेळी केला गेला होता. अर्थात सचिन तेंडुलकरने या अफवा असल्याचं सांगत या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचं स्पष्ट केलं होतं.
काही दिवसांपूर्वी सारा एका क्रिकेटपटूला डेट करत असल्याची खमंग चर्चा रंगली होती. होय, कोलकाताचा दमदार फलंदाज व टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिल आणि सारा हे एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटलं गेलं होतं.


 
लाईमलाईटपासून दूर असलेली सारा सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. 13 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स असलेल्या साराचा फॅशन सेन्स अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. 

Web Title: did Sachin Tendulkar Daughter Sara Tendulkar to make her bollywood debut ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.