सामंथाच्या घटस्फोटानंतर व्हायरल होतंय तिच्या एक्स-बॉयफ्रेन्डचं ट्विट; म्हणाला, धोकेबाज कधीच...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 12:43 PM2021-10-03T12:43:27+5:302021-10-03T12:44:04+5:30

Samantha Ruth Prabhu : नागाच्या प्रेमात पडणारी, त्याच्यासोबत लग्नगाठ बांधणारी आणि आता घटस्फोट घेणारी सामंथा कधीकाळी ‘रंग दे बसंती’ फेम साऊथ अ‍ॅक्टर सिद्धार्थच्या प्रेमात वेडी होती...

Did Samantha Ruth Prabhu's ex-boyfriend Siddharth mock her after separation from Naga Chaitanya? | सामंथाच्या घटस्फोटानंतर व्हायरल होतंय तिच्या एक्स-बॉयफ्रेन्डचं ट्विट; म्हणाला, धोकेबाज कधीच...

सामंथाच्या घटस्फोटानंतर व्हायरल होतंय तिच्या एक्स-बॉयफ्रेन्डचं ट्विट; म्हणाला, धोकेबाज कधीच...

googlenewsNext
ठळक मुद्देसामंथा व सिद्धार्थची पहिली भेट ‘जबरदस्त’ या सिनेमाच्या सेटवर झाली होती. यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. दोघंही सर्रास एकमेकांसोबत फिरताना दिसते.

सामंथा रूथ प्रभु ( Samantha Ruth Prabhu) ही साऊथची आघाडीची नायिका. जगभर तिचे असंख्य चाहते. पण तरिही चित्रपटांपेक्षा पर्सनल लाईफमुळेच तिची अधिक चर्चा झाली. 2017 मध्ये तिने नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यसोबत ( Naga Chaitanya) लग्नगाठ बांधली आणि अचानक चर्चेत आली. या ग्रँड वेडिंगची अनेक दिवस चर्चा होती. पण चार वर्षांतच सामंथा व नागा यांच्यात असं काही बिनसलं की, दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि तो अमलातही आणला. काल सामंथा व नागा दोघांनीही सोशल मीडियावर घटस्फोटाची घोषणा केली.

नागाच्या प्रेमात पडणारी, त्याच्यासोबत लग्नगाठ बांधणारी आणि आता घटस्फोट घेणारी सामंथा कधीकाळी ‘रंग दे बसंती’ फेम साऊथ अ‍ॅक्टर सिद्धार्थच्या ( Siddharth) प्रेमात वेडी होती. इतकी की, दोघंही लिव्ह-इनमध्ये राहत होते. अडीच वर्ष दोघंही एकमेकांसोबत लिव्ह इनमध्ये असतानाच दोघाचं ब्रेकअप झालं. अर्थात या ब्रेकअपमागचं खरं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. यावर ना कधी सामंथा बोलली, ना सिद्धार्थ.
पण आता सामंथा व नागाच्या घटस्फोटानंतर मात्र सिद्धार्थने अप्रत्यक्षपणे आपल्या मनातील भडास काढली आहे. होय, सामंथाचा एक्स-बॉयफ्रेन्ड सिद्धार्थचं एक ट्विट सध्या व्हायरल होतंय.


‘ शाळेत असताना शिक्षकांकडून सर्वप्रथम मी एकच धडा शिकलो होतो, तो म्हणजे, धोकेबाजांचं कधीच भलं होत नाही...,’ असं ट्विट सिद्धार्थने केलं आहे. या ट्विटमध्ये सिद्धार्थने कुठेच सामंथाच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. पण त्याचा इशारा कोणाकडे आहे, हे लपून राहिलं नाही. सामंथा व नागाच्या घटस्फोटानंतर सिद्धार्थच्या या ट्विटची चांगलीच चर्चा आहे. 
सामंथा व सिद्धार्थची पहिली भेट ‘जबरदस्त’ या सिनेमाच्या सेटवर झाली होती. यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. दोघंही सर्रास एकमेकांसोबत फिरताना दिसते. एका इव्हेंटमध्ये सिद्धार्थने आपला परफॉर्मन्स सामंथाला डेडिकेट केला होता. तेव्हा सामंथा लाचताना दिसली होती.

Web Title: Did Samantha Ruth Prabhu's ex-boyfriend Siddharth mock her after separation from Naga Chaitanya?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.