तैमूरला विसरलास का? नेटक-यांनी घेतली करण जोहरची मजा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 09:29 PM2018-08-12T21:29:12+5:302018-08-12T21:32:22+5:30
एकीकडे करणने ‘तख्त’ व ‘तख्त’ची स्टारकास्ट जाहिर केली आणि दुसरीकडे नेटक-यांनी नेपोटिजम अर्थात बॉलिवूडमधील घराणेशाहीवरून करणला पुन्हा एकदा ट्रोल करणे सुरू केले़.
करण जोहरने अलीकडे ‘तख्त’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आणि नेपोटिजमचा भूत पुन्हा एकदा त्याच्या मानगुटीवर येऊन बसला. होय, एकीकडे करणने ‘तख्त’ व ‘तख्त’ची स्टारकास्ट जाहिर केली आणि दुसरीकडे नेटक-यांनी नेपोटिजम अर्थात बॉलिवूडमधील घराणेशाहीवरून करणला पुन्हा एकदा ट्रोल करणे सुरू केले़. अर्थात करणनेही या ट्रोलर्सला जशास तसे उत्तर दिले.
तुम्हाला ठाऊक आहेच की, ‘तख्त’मध्ये करिना कपूर, रणवीर सिंग, जान्हवी कपूर, आलिया भट्ट, भूमी पेडनेकर, विकी कौशल असे तगडे स्टार्स आहेत. मग काय, नेटक-यांनी करणवर अनेक पद्धतीने टीका केली. काहींनी थेट करणच्या जिव्हारी लागणा-या कमेंट लिहिल्या तर काहींनी उपहासात्मक पद्धतीने करणला लक्ष्य केले. एका युजरने करणवर नेपोटिजमचा आरोप लावला.
Another example of #Nepotism by @karanjohar .Favoring friends, kids of friends, family and relatives. I hate watching Bollywood films now. The industry is run like a dynasty now. https://t.co/jKqpLLhzv9
— Arnab Ganguly (@connect_arnab) August 11, 2018
तू फक्त तुझे मित्र, त्यांची मुले आणि नातेवाईकांनाचं संधी देतोस. मला आता बॉलिवूड चित्रपटांचा तिटकारा आलाय. यात घराणेशाही वाढतचं चाललीय, अशा या युजरने लिहिले. या युजरच्या कमेंटवर करणनेही सिक्सर मारला. ‘तू लगेच बॉलिवूड चित्रपट पाहणे बंद कर. नाहीतर जगाचा शेवट अटळ आहे,’ असे त्याने लिहिले.
You forget Taimur.....😂😂
— prem narayan patel (@premnarayansays) August 9, 2018
एका युजरने करिनाचा मुलगा तैमूर यालाही संधी देणार का? असा टोमणा करणला मारला. तू तैमूरला विसरलास का भावा? असे एका युजरने लिहिले.
अन्य एका युजरने करणवर जोरदार प्रहार केला. ‘तख्त’ धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली नाही तर नेपोटिजम माय नेम प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनतोय, असे लिहिले. यावर करणनेही टोला मारला. मॅम, तुमचा सुंदर डीपी तुमच्या स्वभावाशी मेळ खात नाही. हनुवटीवर हात ठेवून कुठल्याशा अज्ञात ठिकाणी तुम्ही बघताय, असे त्याने लिहिले.
तख्त’ या पीरियड ड्रामात अर्थात ऐतिहासिक चित्रपटात मुघल शासनकाळातील एक कथा दाखवली जाईल. राजसिंहासनावरचे प्रेम आणि ते मिळवण्यासाठीची वाट्टेल त्या स्तराला जाण्याचे मनसुबे असे याचे कथानक असेल. शहाजहान आणि मुमताज यांच्या दोन मुलांच्या अर्थात दोन भावंडांमधील सिंहासनासाठीच्या वादाची कथा यात दिसेल. रणवीर व विकी यात दोन भावांची भूमिका साकारतील. आलिया रणवीरच्या प्रेयसीची तर करिना त्याच्या बहिणीच्या भूमिकेत असेल. जान्हवी कपूर विकी कौशलच्या पत्नीची भूमिका वठवणार. ‘धडक’नंतर जान्हवीचा हा दुसरा चित्रपट असेल.या मल्टीस्टारर चित्रपटाचे संवाद हुसैन हैदरी लिहिणार आहेत. २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल.