'पुष्पा' चित्रपटातील 'सामी सामी' गाण्याचं मराठी व्हर्जन ऐकलंत का?, चिमुरडीचं होतंय सर्वत्र कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 05:38 PM2022-03-19T17:38:04+5:302022-03-19T17:38:47+5:30
Pushpa Movie: एका लहान मुलीच्या गोड आवाजातील पुष्पा चित्रपटातील सामी सामी या तेलगू गाण्याचे मराठी व्हर्जन समोर आले आहे.
साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन(Allu Arjun)चा बहुचर्चित चित्रपट पुष्पा (Pushpa Movie) रिलीज बरेच दिवस उलटलेले असताना अद्याप या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये असलेली क्रेझ काही कमी झालेली नाही. या चित्रपटातील गाण्यावरील आणि डायलॉग्सवरील रील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. तसेच अल्लू अर्जुनने केलेली हुक स्टेपदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळते. इतकेच नाहीतर श्रीवल्ली या गाण्याच्या मराठी रिमेकला तर मराठी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले होते. दरम्यान या चित्रपटातील आणखी लोकप्रिय गाणं म्हणजे सामी सामी (Sami Sami Song). त्याचं देखील मराठी व्हर्जन एका चिमुरडीच्या सुरेल स्वरातील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
पुष्पा चित्रपटातील सामी सामी या गाण्यावर रश्मिका मंदाना थिरकताना दिसते आहे. हे गाणे अक्षरशः सर्वांनी डोक्यावर घेतले. तेलगू गाण्याचे आता एका लहान मुलीच्या गोड आवाजात मराठी व्हर्जन समोर आले आहे. हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे आणि त्या लहान मुलीचेही सर्वत्र खूप कौतुक होताना दिसत आहे. त्या मुलीबद्दल अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही.
पुष्पा चित्रपटाचा दुसरा भागदेखील लवकरच भेटीला येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सिनेमाच्या दुसऱ्या पार्टची तयारी सुरू झाली आहे. असं म्हटलं जात आहे की, मेकर्स दुसऱ्या पार्ट नॉर्थ इंडियन प्रेक्षक म्हणजे हिंदी प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून वेगळं काही करणार आहेत. म्हणजे पुष्पाच्या दुसऱ्या भागात नॉर्थ इंडियाशी संबंधित स्टोरी बघायला मिळू शकते. पण अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.