आमिर खान आजही विसरू शकला नाही सनी देओलचे ते शब्द ; म्हणून सोडला होता ‘डर’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 08:00 AM2020-01-31T08:00:00+5:302020-01-31T08:00:02+5:30

आमिर खान व सनी देओल चांगले मित्र होते. पण एका चित्रपटावरून दोघांत बिनसले. पुढे तर आमिरने सनीसोबत कधीही काम न करण्याची शपथच घेतली.

Did You Know Aamir Khan Was Thrown Out Of ‘Darr’, sunny deol was the reason |   आमिर खान आजही विसरू शकला नाही सनी देओलचे ते शब्द ; म्हणून सोडला होता ‘डर’

  आमिर खान आजही विसरू शकला नाही सनी देओलचे ते शब्द ; म्हणून सोडला होता ‘डर’

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘डर’ने आमिर व सनी दोघांनाही नाराज केले. याऊलट  शाहरुख खान यशराजचा आवडता अभिनेता बनला.

बॉलिवूडमध्ये नाती जुळायला, तुटाळला वेळ लागत नाही. मैत्रीचेही तसेच. इथे मित्र कधी वैरी होतील तेही सांगता यायचे नाही. आता आमिर खानचेच बघा ना. आमिर खानसनी देओल चांगले मित्र होते. पण एका चित्रपटावरून दोघांत बिनसले. पुढे तर आमिरने सनीसोबत कधीही काम न करण्याची जणू शपथच घेतली.

तर हा किस्सा आहे 90 च्या दशकातला. यश चोप्रा ‘डर’ या सिनेमावर काम करत होते. फार क्वचित लोकांना माहित असेल की, या चित्रपटासाठी शाहरूख खान नाही तर आमिर खान यश चोप्रा यांची पहिली पसंत होता. यश चोप्रा यांनी सर्वप्रथम आमिरलाच चित्रपटाची कथा ऐकवली होती. आमिरलाही कथा आवडली होती. पण क्लायमॅक्समध्ये मात्र त्याने एक छोटासा बदल सुचवला होता.

मी या  चित्रपटात काम करेल, परंतु मला चित्रपटाच्या क्लायमॅक्स मध्ये छोटासा बदल हवा आहे, असे त्याने थेट यश चोप्रा यांना सांगितले होते. खरे तर यश चोप्रा यांनी आमिर खानला क्लायमॅक्स सांगितला होता तेव्हा त्यांनी संपूर्ण सीनही त्याच्यापुढे उभा केला होता.  सनी देओल आणि आमिर खान दोघे एकमेकांच्या समोरासमोर येतील. आमिर खान सनी देओलला दोन वेळा सूरा मारेल. त्यानंतर तो जुहीला  दूर समुद्र्रात एका बोटीवर घेऊन जाईल. त्यानंतर सनी देओलला जाग येईल, तो त्याच्या जखमेत रूतून बसलेला सूरा काढेल, त्यावर कपडा बांधेल आणि बोटीवर जाऊन आमिरला मारेल, असा हा क्लायमॅक्स सीन होता. ‘डर’ चित्रपटात अगदी असाच क्लायमॅक्स दाखवला गेला आहे. पण या क्लायमॅक्सवर आमिर खान जरा नाखूश होता.  सनी देओलला दोन वेळा सूºयाने भोसकल्यानंतरही तो बोटीवरून येऊन त्याला मारेल, हे आमिरला काही केल्या पटेना. हे वास्तवाला धरून नाही, असे त्याचे मत होते.

यश चोप्रा यांनी आमिरचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्याच्याकडून थोडा वेळ मागून घेतला. यावर मी सनी देओलसोबत सुद्धा चर्चा करतो आणि त्यानंतरच आपण योग्य तो निर्णय घेऊ, असे त्यांनी आमिरला सांगितले.
आमिर खानशी चर्चा केल्यानंतर यश चोप्रा  सनी देओलकडे  गेले. सनी देओल त्यावेळी यशाच्या शिखरावर होता आणि  एक सुपरस्टार होता. यश चोप्रा आमिरच्या मनातील शंका सनी देओलजवळ बोलून दाखवली.दोनवेळा सूरा मारल्यानंतरही हिरोजवळ इतकी शक्ती कशी असू शकते की, तो बोटीवर येऊन विलनला मारेल? आमिरच्या मनातील हा नेमका प्रश्न त्यांनी सनीला सांगितला. त्यावर सनी देओलची प्रतिक्रिया काय असावी? तो जोरजोरात हसू लागला.  चित्रपटातच काय तर खºया आयुष्यात सुद्धा आमिर खानने मला दोनवेळा सूरा भोसकल्यानंतरही मी उठेल आणि त्याला मारेल, असे तो हसत हसत म्हणाला.

आमिरला ही गोष्ट कळली आणि तो लालबुंद झाला. सनीने अशी खिल्ली उडवावी, हे आमिरच्या इतके जिव्हारी लागले की, त्याने ‘डर’ हा चित्रपट करायलाच नकार दिला. इतकेच नाही तर सनीसोबत पुन्हा कधीही काम न करण्याची शपथ घेतली. (अर्थात फक्त एकदा राज कुमार संतोषीच्या शब्दाला मान देऊन आमिर खानने सनी देओलच्या ‘दामिनी’ चित्रपटात एक गाणे केले. परंतु त्या गाण्यात सुद्धा ते एकदाही एका फ्रेममध्ये एकत्र आले नाहीत. आमिर खानचे गाणे चित्रपटाच्या सुरुवातीला होते तर सनी देओलची चित्रपटातील एंट्री इंटरव्हलच्या जरा आधी दाखवण्यात आली.)

आमिरच्या नकारानंतर हा रोल शाहरुख खानकडे गेला. त्याकाळी शाहरुख खान नवीन होता, त्याला चित्रपटांची गरज होती. त्यामुळे त्याने  ही भूमिका कोणत्याही बदलांशिवाय स्वीकारले. शाहरुखचा अभिनय पाहून यश चोप्रा इतके प्रभावित झाले की, त्यांनी त्या चित्रपटात शाहरुखच्या भूमिकेला आणखी वजन देण्याचे ठरवले. मग काय, चित्रपट रिलीज होण्याआधी आमिर दुखावला अन् चित्रपट रिलीज झाल्यावर सनीही दुखावला. एकीकडे आमिरने सनीसोबत कधीही काम न करण्याची शपथ घेतली.  दुसरीकडे सनीने   यशराज सोबत कधीच चित्रपट न करण्याचा प्रण केला. एकंदर काय तर ‘डर’ने आमिर व सनी दोघांनाही नाराज केले. याऊलट  शाहरुख खान यशराजचा आवडता अभिनेता बनला.
 

Web Title: Did You Know Aamir Khan Was Thrown Out Of ‘Darr’, sunny deol was the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.