या अभिनेत्यामुळे किंग खान शाहरुख आज बनलाय बॉलिवूडचा बादशाह

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 07:06 PM2021-09-27T19:06:28+5:302021-09-27T19:10:57+5:30

‘डर’, ‘बाजीगर’, ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’, ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘देवदास’, ‘चक दे इंडिया’ अशा विविध चित्रपटात एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकांमुळेच रसिकांनी त्याला बादशाह आणि किंग अशी उपाधी दिली.

Did you know, This actor rejected almost 200 films, know why he was offered movie before Shahrukh Khan | या अभिनेत्यामुळे किंग खान शाहरुख आज बनलाय बॉलिवूडचा बादशाह

या अभिनेत्यामुळे किंग खान शाहरुख आज बनलाय बॉलिवूडचा बादशाह

googlenewsNext

हिंदी चित्रपटसृष्टीत काही कलाकारांकडे एकाहून एक बड्या बॅनर्सचे सिनेमा असतात. या कलाकारांकडे दिग्दर्शकांची रांग लागलेली असते. तर काही कलाकारांचा संघर्ष काही संपता संपत नाही. कामासाठी स्ट्रगल करावा लागणारे अनेक कलाकार पाहायला मिळतील. कलाकारांच्या या दोन प्रकारांसह आणखी एका विशेष आणि हटके स्टाईलचेही कलाकार असतात. जे कसला मागचा पुढचा विचार न करता सिनेमा नाकारतात. तत्त्वांशी कोणत्याही प्रकारची तडजोड या कलाकारांना मान्य नसते.

अशाच मोजक्या आणि निवडक कलाकारांमध्ये अभिनेता सुदेश बेरी यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. सुदेश बेरीने एक दोन नाही तर तब्बल २०० सिनेमांच्या ऑफर्स धुडकावून लावल्यात होत्या. हिंदी चित्रपटसृष्टीत गाजलेल्या 'डर' या सिनेमातील किंग खान शाहरुखची भूमिका सुदेश बेरीलाच ऑफर करण्यात आली होती. मात्र ही भूमिका सुदेशने नाकारली. 

गर्लफ्रेंड्स आणि काम केलेले सिनेमा यांची आकडेवारी ठेवण्यात काहीच रस नाही असे सुदेश यांनी म्हटले आहे. आपल्या समकालीन कलाकारांनी २५ ते ३० वर्षांत ३०० सिनेमा केले असतील तर किमान तेवढेच सिनेमा आपण नाकारले असतील असं सुदेश यांनी म्हटलंय.

 

आजोबांनी दिलेल्या सल्ल्यानुसार कधीही पैसा, मोह आणि माया या मागे लागलो नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. सुदेश यांनी बॉक्सर बनावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र एका अपघातानंतर सुदेश यांना बॉक्सिंग सोडावी लागली. सुदेश यांनी आपला लेक सूरजवर करिअरबाबत कधीच दबाव टाकला नाही. त्याला जीवनात काय करायचंय यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिल्याचं सुदेश यांनी सांगितलंय. 

‘डर’, ‘बाजीगर’, ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’, ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘देवदास’, ‘चक दे इंडिया’ अशा विविध चित्रपटात एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकांमुळेच रसिकांनी त्याला बादशाह आणि किंग अशी उपाधी दिली. हाच किंग संपत्तीबाबतही खराखुरा किंग  आहे. एका इंग्रजी वेबवसाईटनुसार एकूण संपत्ती सुमारे ४१ अब्ज ६३ कोटी रुपयांच्या घरात आहे. शाहरुख वांद्रे इथल्या ज्या बंगल्यात राहतो त्या आलिशान मन्नत बंगल्याची किंमत जवळपास २०० कोटीच्या घरात आहे.

दुबईमध्ये शाहरुखचा ‘व्हिला के ९३’ हा बंगला आहे तर लंडनमधील पार्क लेन इथंसुद्धा त्याचं घर आहे. ही संपत्ती जवळपास १६७ कोटी रुपयांची आहे. शाहरुखकडे बऱ्याच महागड्या आणि आलिशान गाड्या आहेत. यांत ‘ऑडी A6’, ‘बीएमडब्ल्यू i8’, ‘बीएमडब्ल्यू 7 सीरिज’, ‘हार्ले डेव्हिडसन डायना स्ट्रीट बॉब’ ‘बेंटली कॉन्टिनेंटल जीटी’ अशा गाड्यांचा समावेश आहे. 
 

Web Title: Did you know, This actor rejected almost 200 films, know why he was offered movie before Shahrukh Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.