कॅनडामधील एका रस्त्याला दिलेलं आहे 'या' भारतीय लोकप्रिय गायकाचं नाव, कोण आहे तो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 15:12 IST2025-01-07T15:11:07+5:302025-01-07T15:12:05+5:30

कॅनडाने भारतीय लोकप्रिय गायकाचा एका अनोख्या पद्धतीने गौरव केलेला आहे.

Did You Know Ar Rahman Has A Street Named After Him In Canada | कॅनडामधील एका रस्त्याला दिलेलं आहे 'या' भारतीय लोकप्रिय गायकाचं नाव, कोण आहे तो?

कॅनडामधील एका रस्त्याला दिलेलं आहे 'या' भारतीय लोकप्रिय गायकाचं नाव, कोण आहे तो?

असे अनेक गायक आहेत, ज्यांची गाणी ऐकल्यावर भान हरपून जाते आणि मन मंत्रमुग्ध होतं. अनेक जण त्यांच्या गाण्यांची पारायणं करत असतात, तीच गाणी रिपीट मोडवर तासनतास ऐकत असतात. असेच एक गायक आहेत. ज्यांनी आपल्या ऑस्कर , ग्रॅमी, गोल्डन ग्लोब आदी महत्त्वाच्या पुरस्कारांवर नाव कोरत खऱ्या अर्थाने भारताचा तिरंगा जागतिक पातळीवरील मानाने फडकवत ठेवला आहे. या गायकाचा फक्त देशातच नाही तर विदेशातही मोठा सन्मान केला जातो. 

संगीत शिखरावर पोहचलेले ते गायक आहेत संगीतकार ए. आर. रहमान (A. R. Rahman).  नुकतंच ६ जानेवारी रोजी त्यांनी आपला ५८वा वाढदिवस साजरा केला. यादिवशी जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. ए. आर. रहमान यांची जगभरात ख्याती आहे.  तुम्हाला माहितेय जगाच्या नकाशावरील महत्त्वाच्या देशांपैकी एक असलेल्या कॅनडाने ए. आर. रहमान यांचा एका अनोख्या पद्धतीने गौरव केलेला आहे. मरखम शहरातील एका रस्त्याचे नामकरण 'ए. आर. रेहमान स्ट्रीट', असे करण्यात आलेले आहे. 

ए. आर. रहमान यांचा अनोखा सन्मान देशवासियांसाठी खूप महत्वाचा आणि अभिमानस्पद आहे.   संगीतावरील अपार श्रद्धा असलेल्या ए. आर. रहमान यांचं यश हे नेत्रदीपक तर आहेच, पण अनेकांसाठी प्रेरणादायीही आहे. ए. आर. रहमान यांची गणना भारतातील सर्वात श्रीमंत संगीतकारांमध्ये केली जाते. १९९२ मध्ये रोजा या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेल्या रहमान यांच्याकडे आज सुमारे २१०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. देश-विदेशात त्यांची अनेक आलिशान घरं असून त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्याही आहेत.

Web Title: Did You Know Ar Rahman Has A Street Named After Him In Canada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.