बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला ओळखलंत का, शेअर केला चेहऱ्यावरील डागांसोबतचा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 19:12 IST2020-03-30T19:09:47+5:302020-03-30T19:12:16+5:30
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने डागांसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला ओळखलंत का, शेअर केला चेहऱ्यावरील डागांसोबतचा फोटो
कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सिनेइंडस्ट्रीही थांबली आहे. सामान्य लोकांसोबत सेलिब्रेटीदेखील लॉकडाउन झाले आहेत. अभिनेत्री ईशा गुप्ता हीदेखील घरीच असून लॉकडाउनच्या आधीपासून ती सोशल मीडियावर सक्रीय आहे. ईशा गुप्ता चित्रपटात दिसली नसली तरी सतत चर्चेत असते. होय, चित्रपट नसले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत राहण्याची कला ईशाला चांगलीच अवगत आहे. यासाठी स्वत:चे हॉट फोटो व व्हिडीओ ती शेअर करत असते.
ईशाने नुकताच एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत ईशा नो मेकअप लूकमध्ये दिसते आहे. या फोटोत तिच्या चेहऱ्यावरील डाग दिसत आहे. तिच्या या फोटोची तुलना हॉलिवूड अभिनेत्री केंडल जेनरसोबत केली जात आहे.
ईशाला बॉलिवूडची ‘अँजेलिना जॉली’ म्हटले जाते. 2007 मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनल हा किताब आपल्या नावावर करणारी ईशा बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
इमरान हाश्मीसोबत ईशा गुप्ताने ‘जन्नत 2’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती इमरान हाश्मीच्या अपोझिट दिसली होती.
ईशा बॉलिवूडमध्ये बेबी, रुस्तम व बादशाहो, कमांडो, चक्रव्यूह सारख्या चित्रपटात झळकली आहे. शेवटची ईशा ‘टोटल धमाल’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अजय देवगण, अनिल कपूर व माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते. बॉक्स आॅफिसवर या सिनेमा चांगला गल्ला जमावला होता.