या एका कारणामुळे करण जोहरने नेहा धुपियासह लग्न करण्यास तीन वेळा दिला होता नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 05:08 PM2021-05-26T17:08:29+5:302021-05-26T17:15:42+5:30

बॉलिवूडचा डॅडी प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता करण जोहर सरोगसीच्या माध्यमातून दोन मुलांचा पिता बनला आहे.त्याच्या मुलाचं नाव यश जोहर तर लेकीचं नाव रूही जोहर असं आहे.

Did you know Karan Johar rejected Neha Dhupia's marriage proposal thrice because of this reason? | या एका कारणामुळे करण जोहरने नेहा धुपियासह लग्न करण्यास तीन वेळा दिला होता नकार

या एका कारणामुळे करण जोहरने नेहा धुपियासह लग्न करण्यास तीन वेळा दिला होता नकार

googlenewsNext

प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने लग्न केले नसलं तरी तो सरोगसीच्या माध्यमातून दोन मुलांचा पिता बनला आहे.त्याच्या मुलाचं नाव यश जोहर तर लेकीचं नाव रूही जोहर असं आहे. करण आपल्या जुळ्या मुलांसह नेहमीच क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसतो. नेहा धुपियाने अंगद बेदीसह लग्न करत संसार थाटला असला तरी नेहाला बॉलिवूडचा डॅडी करण जोहरबरोबर लग्न करायचे होते. 

वाचून तुम्हालाही थोडा धक्का बसला असणारच. खुद्द नेहानेच ‘नो फिल्टर विथ नेहा’ या टॉकशो मध्ये करणसोबतचा हा खास किस्सा सांगितला. नेहा धुपियाला करण जोहरसोबत लग्न करण्याची इच्छा असल्याचे ऐकूनच सा-यांनाच धक्का बसला असावा. नेहाने तिच्या संपूर्ण आयुष्यात केवळ करण जोहरलाच सगळ्यात जास्त लग्नासाठी विचारले असावे असेही तिने सांगितले. 


नेहाने करणला एकदा नाही दोनदा नाही तर तीनवेळी लग्नासाठी प्रपोज केले होते. मात्र या तिन्ही वेळा करण जोहरने नकारच दिला. करण जोहरने नेहाला नकार देण्यामागे कारणही तसेच विचित्र होते. करणला नेहाच्या शरीराच्या कोणत्याही पार्टमध्ये इंटरेस्ट नव्हता. म्हणून त्याने नेहा वारंवार लग्नासाठी नकार दिल्याचे धक्कादायक खुलासा केला होता. तर दुसरीकडे करण जोहर आणि ट्विंकल एकत्र कॉलेजमध्ये होते. त्यामुळे करणचं ट्विंकलवर प्रेम होतं. मात्र अक्षयच्या एंट्रीमुळे करणचंही हार्टब्रेक झालं. ट्विंकलमुळेच करणने आजपर्यंत लग्नच केले नसल्याचेही बोलले जाते. 

'कुछ कुछ होता है' या करणच्या सिनेमात टीना ही भूमिका ट्विंकल खन्नाने साकारावी असे करणला वाटत होते. पण ट्विंकलने या सिनेमात काम करण्यास नकार दिला होता. विशेष म्हणजे ट्विंकलला सगळे टीना या नावानेच हाक मारत असल्याने त्याने या सिनेमातल्या नायिकेचे नाव टीना ठेवले होते.

एकदा करण जोहरने त्याच्या लग्नाविषयी बोलताना म्हणाला होता की मी आणि एकता कपूर दोघेही लग्नासाठी योग्य जोडीदार शोधत होतो. जर आम्हाला योग्य जोडीदार सापडला नाही तर आम्ही एकमेकांशी लग्न करू शकतो असे आमच्यात ठरले होते. मात्र मैत्रीपलीकडे दोघांचे नाते पुढे गेलेच नाही. शेवटी आज दोघांनीही सरोगसीद्वारे सिंगल पॅरेंट बनत आपले आयुष्यात बिझी झाले. 
 

Web Title: Did you know Karan Johar rejected Neha Dhupia's marriage proposal thrice because of this reason?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.