इंडस्ट्रीत तुला कधीच काम मिळणार नाही 'ती' व्यक्ती अक्षय कुमारला असं का म्हणाली होती?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 04:32 PM2023-10-20T16:32:02+5:302023-10-20T16:38:52+5:30
१९९० मध्ये अक्षयने ‘खिलाडी’ म्हणून स्वत:चे स्थान निर्माण केले. १९९९ मध्ये असाच एक चित्रपट होता, तो म्हणजे ‘संघर्ष’.
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा अलिकडच्या काळात काहीशा सामाजिक आशयांच्या चित्रपटांकडे वळलेला अक्षय निर्विवाद एक सुपरस्टार आहे. . अक्षय कुमार बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणार्यांपैकी एक आहे. पण इथपर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हताच. कदाचित या संघषार्मुळेच अक्षय बॉलिवूडमधला ‘सबसे बडा खिलाडी; ठरला. आधी केवळ अॅक्शनपट करणारा अक्षयकुमार अशीच त्याची ओळख होती. पण नंतर अॅक्शनसोबत कॉमेडीही त्याने स्विकारली.
१९९० मध्ये अक्षयने ‘खिलाडी’ म्हणून स्वत:चे स्थान निर्माण केले. १९९९ मध्ये असाच एक चित्रपट होता, तो म्हणजे ‘संघर्ष’. १९ वर्षांपूर्वी आलेला हा चित्रपट हिट तर झालाच पण या चित्रपटाने अक्षयला गंभीर अभिनेत्यांच्या रांगेत नेऊन बसवले. यात चाहत्यांना अक्षयची अॅक्शन कमी अन् त्याचा सीरिअस अंदाज जास्त भावला.
लहान असताना अक्षय अतिशय खोडकर म्हणून म्हणून प्रसिध्द होता. अभ्यासात जराही रस नसलेल्या अक्षयला क्रिकेट आणि व्हॉलिबॉलसारख्या खेळात गती होती. वयाच्या आठव्या वर्षी त्याने मार्शल आर्ट शिकण्यास सुरुवात केली. मार्शल आर्ट शिकण्यासाठी तो बँकॉकला गेला होता. यानंतर थायलंडला जाऊन त्याने मौय थायचे प्रशिक्षण घेतले. या काळात तेथील हॉटेलमध्ये शेफ आणि वेटरचे कामही त्याने केले.
चित्रपटसृष्टीतील संघर्षाच्या काळात अक्षयला सर्वप्रथम मॉडेलिंगची एक ऑफर मिळाली. यासाठी त्याला संध्याकाळी ६ ची फ्लाईट घ्यायची होती. त्या दिवशी सकाळी ५ वाजता अक्षय कुमार उठला आणि व्यायामासाठी तयार होत असतानाच त्याचा फोन वाजला. पलीकडची व्यक्ती प्रचंड चिडलेली होती. तुझ्यासारख्या अनप्रोफेशनल व्यक्तिला कधीच काम मिळणार नाही, असे ती व्यक्ती म्हणाली. अक्षय हे ऐकून अवाक् झाला. त्याने आपले एअरतिकिट पुन्हा एकदा तपासून बघितले तर, त्यावर आदल्या दिवशी सकाळी ६ वाजताची वेळ होती. अशारितीने अक्षयची ती पहिली संधी हुकली. पण या हुकलेल्या संधीने अक्षयला एक सुवर्णसंधी मिळवून दिली.