जेव्हा अवघ्या 13 व्या वर्षीच आई बनली होती ही अभिनेत्री, त्यानंतर अशी बनली सुपरस्टार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 10:04 AM2020-03-14T10:04:53+5:302020-03-14T10:11:33+5:30
'मुंदरु मुडिचू' सिनेमात रजनीकांत आणि कमलहसन यांच्या सिनेमात मुख्य भूमिका होती.
हिंदी चित्रपटसृष्टीची चांदनी म्हणजेच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी रसिकांच्या मनात कायम घर करून आहेतच. श्रीदेवी या हरहुन्नरी आणि अष्टपैलू अशा नायिका होत्या.त्यांचा अभिनय, डान्स, कॉमेडी यावर रसिक अक्षरक्ष: फिदा होते. हिंदीसह तमिळ, तेलुगू सिनेमातही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. रसिकांनीच चांदनीला पहिली लेडी सुपरस्टार बनवलं. याच अभिनयाच्या जोरावर श्रीदेवी यांना हिंदी चित्रपटसृष्टीत मल्लिका-ए-हुस्न किंवा बॉलीवुडची पहिली महिला सुपरस्टार म्हणून संबोधलं जातं. हा तो काळ होता ज्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीत फक्त आणि फक्त अभिनेत्यांचाच बोलबाला होता. सिनेमातील नायिका म्हणजे केवळ नाचणारी, गाणारी आकर्षक बाहुली किंवा मग नायकाची प्रेमिका एवढंच समजलं जायचं. मात्र याच काळात श्रीदेवी यांनी आपलं श्रेष्ठत्व दाखवून दिले. आपला अभिनय, लोभस सौंदर्य, नृत्य, गंभीर भूमिका तितक्याच खुबीने साकारण्याची कला आणि कॉमेडीचं टायमिंग यामुळे श्रीदेवी यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःचं असं वेगळे स्थान निर्माण केले.
श्रीदेवी यांचा 'मॉम' हा अखेरचा सिनेमा ठरला. यातील श्रीदेवी यांच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं होतं. भारतासह मॉम हा चित्रपट पोलंड, यूएई, सिंगापूर आणि अमेरिकेसह ४० ठिकाणी प्रदर्शित झाला होता. श्रीदेवी यांनी एका आईची भूमिका साकारली होती. ही आई आपल्या सावत्र लेकीचा बदला कशारितीने घेतं हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का? श्रीदेवी यांनी वयाच्या अवघ्या 13 वर्षीच आईची भूमिका साकारली होती. ते ही रजनीकांतच्या यांच्या सावत्र आईची भूमिका श्रीदेवी यांच्या वाट्याला आली होती.
'मुंदरु मुडिचू' असे या सिनेमाचे नाव होते. इतक्या कमी वयात थेट आईची भूमिका साकारणारी श्रीदेवी पहिल्या अभिनेत्री होत्या.श्रीदेवी, रजनीकांत आणि कमलहसन यांच्या सिनेमात मुख्य भूमिका होती. पण हा सिनेमा लक्षात राहिला तो केवळ श्रीदेवी यांच्यामुळेच. 13 वर्षात साकारलेली आईच्या भूमिकेने रसिकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले. सर्वच स्तरांवरून श्रीदेवी यांच्या कामाचे कौतुक झाले होते.