आईच्या कडेवर असलेला हा क्युट चिमुकला आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार, तुम्ही ओळखलंत का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 08:00 AM2023-05-06T08:00:00+5:302023-05-06T08:00:02+5:30

फोटोत आईच्या कडेवर असलेला हा चिमुकला आज दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा पहिली पसंती बनला आहे.

Did you know this cute baby, today his become bollywood superstar | आईच्या कडेवर असलेला हा क्युट चिमुकला आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार, तुम्ही ओळखलंत का ?

आईच्या कडेवर असलेला हा क्युट चिमुकला आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार, तुम्ही ओळखलंत का ?

googlenewsNext

गेलेली वेळ कधीच परत येत नाही, फक्त आठवणीच राहतात! पण काही खास क्षण आपण कॅमेऱ्यात टिपतो. मग जेव्हा जेव्हा ते फोटे समोर येतात तेव्हा तो काळही डोळ्या पुढे उभा राहतो. बॉलिवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे काही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता-अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो (Bollywood Actress Childhood Pics) सोशल मीडियावर चर्चेत येत असतात.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोतील आईच्या कडेवर असलेला हा निरागस मुलगा कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय. तुम्हाला एक हिंट देतो, या मुलाने यावर्षात सुपरहिट चित्रपट दिला आहे, हा आज बॉलिवूडचा मोठा स्टार बनला आहे. बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींबरोबर त्याने काम केलं आहे.

इतकेच नाही तर हा चिमुकला आज दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही पहिली पसंती बनला आहे. आईच्या कडेवर असलेला हा चिमुकला दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन(Kartik Aaryan)  आहे. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचे नाव आज इंडस्ट्रीतील टॉप कलाकारांच्या यादीत सामील झाले आहे.  हा चिमुकला आज दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही पहिली पसंती बनला आहे. 

कार्तिक आर्यनने प्यार का पंचनाम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. कार्तिकला खरी ओळख मिळाली ती  ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटातून. यानंतर कार्तिकने एकापाठोपाठ अनेक हिट चित्रपट दिले. गेल्या वर्षी रिलीज झालेला त्याचा 'भूल भलैया' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.

Web Title: Did you know this cute baby, today his become bollywood superstar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.