या 7 मुलींपैकी एक मुलगी आज बॉलिवूडवर गाजवतेय राज्य, आज आहे तिचा वाढदिवस;ओळखलंत का तिला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 09:28 IST2023-06-08T08:00:00+5:302023-06-08T09:28:38+5:30
फोटोत तुम्हाला दिसत असलेल्या शाळेच्या ड्रेसमधील सात मुलींपैकी एक बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे..तुम्ही ओळखू शकता का?

या 7 मुलींपैकी एक मुलगी आज बॉलिवूडवर गाजवतेय राज्य, आज आहे तिचा वाढदिवस;ओळखलंत का तिला?
वरील फोटोत तुम्हाला दिसत असलेल्या सात मुलींपैकी एक मुलगी बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे..तुम्हाला ओळखता येत आहे का? नाही....? चला तर मग आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. ही बॉलिवूड अभिनेत्री तिच्या फिटनेससाठी खूप चर्चेत असते.
खरं तर, या सात मुलींमध्ये टॉप लाईनच्या मध्यभागी उभी असलेली मुलगी म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी. हा थ्रोबॅक फोटो स्वत: शिल्पाने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता, ज्यामध्ये ती तिच्या शाळेतील मैत्रिणीसोबत उभी आहे. या फोटोमध्ये शिल्पानेही पांढऱ्या रंगाचा शाळेचा ड्रेसमध्ये ती कॅमेऱ्याकडे पाहून हसत आहे.
बॉलिवूडमध्ये आपल्या अदाकारीने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आज वाढदिवस आहे. शिल्पाचा जन्म 1975 मध्ये मॅंगलोर कर्नाटकमध्ये झाला होता. 25 वर्षांआधी बाजीगर या सिनेमातून तिने आपल्या बॉलिवूड करीअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने 40 सिनेमांमध्ये काम करत आपली जादू चालवली. शिल्पा शेट्टीचा जन्म जरी कर्नाटकात झाला असला तरी तिचं बालपण मुंबईतच गेलं आहे. शिल्पाने चेंबूरच्या एंथनी गर्ल्स हायस्कूलमधून शालेय शिक्षण घेतलं आणि पुढील शिक्षण पोद्दार कॉलेजमधून केलं. शिल्पा ही भरतनाट्यमही करते. त्यासोबतच ती कॉलेजमध्ये वॉलीबॉल टीमची कॅप्टनही राहिली आहे आणि कराटेमध्ये ब्लॅक बेल्टही आहे.
शिल्पा ही नेहमीच आपल्या बोल्ड अवतारासाठी ओळखली जाते. आज एका मुलाची आई असूनही ती फिटनेसबाबत लोकांना धडे देऊ शकते इतकी फिट आहे. 1994 मध्ये आलेला आग हा सिनेमा शिल्पाचा पहिला सिनेमा होता. पण हा बाजीगरनंतर रिलीज झाला.