‘पद्मावती’तील रूबाबदार शाहिद कपूर तुम्ही पाहिलातं?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 10:28 AM2017-11-10T10:28:32+5:302017-11-10T15:58:32+5:30
‘पद्मावती’वरून वादाचे मोहोळ उठले असतानाच आज या चित्रपटाचे आणखी एक नवे पोस्टर आऊट झाले. या पोस्टरमध्ये शाहिद कपूर राजा ...
‘ द्मावती’वरून वादाचे मोहोळ उठले असतानाच आज या चित्रपटाचे आणखी एक नवे पोस्टर आऊट झाले. या पोस्टरमध्ये शाहिद कपूर राजा रावल रतनसिंगच्या भूमिकेत दिसतोय. सिंहासनावर बसलेल्यर आणि डोक्यावर मुकूट असलेल्या शाहिद कपूरचा पोस्टरमधील रूबाब बघण्यासारखा आहे. यापूर्वी शाहिदचे एक पोस्टर आऊट झाले होते. त्यात तो फाटक्या कपड्यांत आणि शृंखलांनी जखडलेला दिसला होता. पण या फोटोत त्याचा शाही अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळतो आहे.
या चित्रपटात शाहिद कपूर राणी पद्मावतीचा पती राजा रावल रतन सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. या रोलसाठी शाहिदने बरीच मेहनत घेतली आहे. लूक आणि बॉडी या दोन्हींवर त्याने घेतलेली मेहनत फळास आली, असेच हे पोस्टर पाहिल्यानंतर वाटते.
ALSO READ :Padmavati Controversy : सुप्रीम कोर्टाचा दिलासा! आता ‘पद्मावती’च्या वादाचा चेंडू सेन्सॉर बोर्डाच्या कोर्टात!
चित्रपटात राणी पद्मावतीची भूमिका दीपिका पादुकोण साकारते आहे. तर अलाऊद्दीन खिल्जीच्या भूमिकेत रणवीर सिंग दिसणार आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा हा चित्रपट सध्या प्रचंड वादात आहे. राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरातेत या चित्रपटाच्या रिलीजला विरोध होत आहे. हा वाद सुप्रीम कोर्टातही पोहोचला होता. अर्थात सुप्रीम कोर्टाने मात्र भन्साळींना दिलासा दिला आहे. पद्मावती’च्या रिलीजवर बंदी घालण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. आता ‘पद्मावती’च्या रिलीजचा वाद सेन्सॉर बोर्डाच्या कोर्टात आला आहे. कारण ‘पद्मावती’ रिलीज व्हावा की नाही, याचा निर्णय सेन्सॉर बोर्ड घेईल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. कालच ‘पद्मावती’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर स्पष्टीकरण दिले होते. कुणाच्याही भावना दुखावतील, असे काहीही चित्रपटात नाही. चित्रपट साकारताना आम्ही राजपुत घराणेशाहीची मानमर्यादा राखली आहे, असे त्यांनी म्हटले होते. आता या वादांनंतर ‘पद्मावती’ रिलीज होतो वा नाही, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ‘पद्मावती’ एकूण १५० देशांत रिलीज करण्याची योजना आहे. १८० कोटी रुपए खर्चून बनलेला हा चित्रपट येत्या १ डिसेंबरला रिलीज होणार आहे. भारतात हा चित्रपट एकूण ४५०० स्क्रीन्सवर रिलीज केला जाणार आहे.