रजनीकांत यांच्या पेटाचा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 16:34 IST2018-12-28T16:31:38+5:302018-12-28T16:34:27+5:30
साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांच्या 2.0 नंतर 'पेटा' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला तयार आहे. कार्तिक सुभाराजच्या दिग्दर्शन खाली तयार होणाऱ्या 'पेटा'चा ट्रेलर आऊट झाला आहे.

रजनीकांत यांच्या पेटाचा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का ?
साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांच्या 2.0 नंतर 'पेटा' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला तयार आहे. कार्तिक सुभाराजच्या दिग्दर्शन खाली तयार होणाऱ्या 'पेटा'चा ट्रेलर आऊट झाला आहे. रजनीकांत यांच्याशिवाय यात विजय सेथुपत्ती, त्रिशा, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि बॉबी सिम्हा यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमात थलायवा एक गँगस्टारच्या भूमिकेत दिसणार आहेत. पेटा तुम्हाला 1980 ते 90 च्या दशकाची आठवण करुन देईल. ट्रेलरमध्ये सगळीकडे रजनीकांत दिसत आहेत.
अॅक्शन आणि लव्हस्टोरी असा कॉम्बो या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे ट्रेलरवरुन कळते. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर आऊट झाला होता. तेव्हापासून रजनीकांत यांचे फॅन्स या ट्रेलरची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होते. 'पेटा'चा दिग्दर्शक कार्तिक आणि अभिनेता विजयसोबत हा त्यांचा दुसरा प्रोजेक्ट आहे. याआधी दोघांसोबत 'पिज्जा'मध्ये एकत्र काम केले आहे. नवाजुद्दीन या सिनेमातून तमिळ इंडस्ट्रीत पदार्पण करतो आहे. नवाज यात व्हिलनची भूमिका साकारतो आहे. या सिनेमाला घेऊन नवाज खूपच उत्सुक आहे. सिनेमाचे शूटिंग उत्तराखंडमध्ये झाले आहे. अभिनेत्री सिमरन बग्गासोबत रजनीकांत यांची रोमाँटिक केमिस्ट्री दिसतेय.